Shiv Sena Supreme
esakal
Supreme Court Hearing: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद केला आहे. गेल्या आठवड्यातील सुनावणीनंतर काल आणि आज सलग दोन दिवस या प्रकरणावर सुनावणी झाली. सिब्बल यांनी यापूर्वी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. काल त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर आक्षेप घेतला. आज त्यांनी पक्षांतरबंदी कायदा आणि २०१८च्या शिवसेना पक्षघटनेचा मुद्दा उपस्थित केला.