Shirsat Vs Andhare : शिरसाट - अंधारे वाद चिघळला; महिला आयोगाने सुनावलं अन् दिले कारवाईचे आदेश

मी वक्तव्यावर ठाम आहे, कोणाचीही माफी मागणार नाही, असं संजय शिरसाट म्हणाले.
Sanjay Shirsat Sushma Andhare
Sanjay Shirsat Sushma AndhareSakal

सुषमा अंधारे आणि संजय शिरसाट यांच्यातला वाद आता चांगलाच चिघळताना दिसत आहे. सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची आता महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे.

याबद्दल महिला आयोगाने ट्वीट करत आपली भूमिका मांडली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, "छत्रपती संभाजीनगर येथे एका जाहीर सभेमध्ये बोलताना आमदार श्री संजय शिरसाठ यांनी श्रीमती सुषमा अंधारे यांच्याबाबत अश्लाघ्य भाषेत टीका केली याबाबतची तक्रार महिला आयोगाकडे श्रीमती अंधारे यांनी दाखल केली आहे."

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील महिलेचा अपमान करून त्यांचे खच्चीकरण करण्याचे प्रकार वाढत असल्याचे दिसून येत आहे.कोणत्याही महिलेबाबत लोकप्रतिनिधींकडून अशा भाषेचा वापर होणे ही गंभीर बाब आहे याची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली असल्याचं चाकणकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Sanjay Shirsat Sushma Andhare
Sushma Andhare: सुषमा अंधारेंची महिला आयोगात धाव; शिरसाटांना वक्तव्य भोवणार

याप्रकरणी योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांना देण्यात आले आहेत. तसेच या कार्यवाहीचा चौकशी अहवाल ४८ तासांत आयोग कार्यालयास पाठविण्यात यावा अशा सूचना महिला आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, मी कधीही शब्दावर फिरवत नाही. मी माझा वक्तव्यावर ठाम आहे मी कुणाचीही माफी मागणार नाही, अशी ठाम भूमिका शिरसाट यांनी मांडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com