

Supreme Court Hearing On Shivsena Symbol And Name Today
Esakal
'शिवसेना' हे पक्षनाव व 'धनुष्यबाण' चिन्हाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज तर 'राष्ट्रवादी काँग्रेस' हे पक्षनाव आणि 'घड्याळ' चिन्हाच्या वादावर गुरूवारी अंतिम सुनावणी होणार आहे. दोन्ही खटल्यांतील बहुतांश मुद्दे समान असल्याने त्यांची एकत्रित सुनावणी घेतली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या खटल्याच्या अंतिम सुनावणीला सुरुवात होत असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.