'उठा उठा धनुष्यबाणाची जाण्याची वेळ आली! 'बाण' कुणाला लागणार?'| Shivsena Symbol Row | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena Symbol Row

Shivsena Symbol Row : 'उठा उठा धनुष्यबाणाची जाण्याची वेळ आली! 'बाण' कुणाला लागणार?'

Shivsena Symbol Row Supreme Court Kapil Sibbal Argument : राज्याच्या राजकारणाला मोठं वळण देणारी घटना काही दिवसांपूर्वी घडली. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करुन आमदारांची एकजुट करुन शिवसेनेला रामराम ठोकला आणि वेगळी चुल मांडली. मात्र यासगळ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना वरुन वाद सुरु झाला. जो अजुनही सुरुच आहे.

काही झालं तरी शिवसेना आमचीच. त्यावर आमचा अधिकार अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. यावेळी ठाकरे यांनी आपल्या सभांमधून शिंदेवर कडाडून टीका केली होती. बाळासाहेबांचे नाव तुम्ही लावू शकत नाही. तो तुमचा अधिकार नाही. बंडखोरी केली किमान काही गोष्टींची जाणीव ठेवून तरी आपल्या निर्णयाचा विचार करावा. अशी भूमिका घेतली होती.

उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे हा वाद आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समोर आहे. आयोगात पक्षचिन्हावरुन लढाई सुरु झाली आहे. साऱ्या महाराष्ट्राचे त्याकडे लक्ष लागले आहे. यासगळ्यात कुणाचा विजय होणार याची कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे. आज कोर्टामध्ये चिन्ह आणि पक्ष यावरुन युक्तिवाद सुरु होता. दुसरीकडे सोशल मीडियावर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा: Shivsena Symbol Row : "शिवसेनेतील फूट म्हणजे..." ; ठाकरे गटाच्या वकीलांचा महत्वाचा युक्तिवाद

आज बंडखोरी करुन आमदार, खासदार झालेले यापूर्वी शिवसेनेच्या चिन्हावर आणि नावावर निवडून आले आहेत. असा युक्तिवाद उद्धव ठाकरेंच्यावतीनं करण्यात आली होती. यापूर्वी १० जानेवारी रोजी निवडणूक आयोगात सुनावणी झाली तेव्हा एकनाथ शिंदे यांचे वकील महेश जेठमलानी यांनी २०१८ मध्ये शिवसेनेची घटना ज्या पद्धतीने बदलण्यात आली ती बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद केला होता. एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमत असल्याचे शिंदे गटाच्या वतीने सांगण्यात आले.

हेही वाचा: ShivSena Symbol: 'धनुष्यबाण' चिन्हाबाबत प्रश्नचिन्ह कायम? 'या' दिवशी होणार पुढील सुनावणी

ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी देखील जोरदार युक्तिवाद केला होता. वेगवेगळ्या पद्धतीनं, दाखल्यांचा, प्रसंगांचा, भाषणांचा उल्लेख करत मोठ्या अभ्यासपूर्वक युक्तिवाद केला गेला. शिवसेनेत दाखवलेल्या फुटीला काहीही अस्तित्व नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी शिवसेना आहे. शिवसेनतील फुट आयोगाने ग्राह्य धरु नये, असे कपिल सिब्बल म्हणाले.

यासगळ्यात शिवसेना कुणाची आणि शिवसेनेचे पक्षचिन्ह ते कुणाकडे जाणार याविषयी उत्सुकता कायम आहे. दोन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्यात वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतरे समोर आली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना कुणाची आणि शिवसेनेचे मुख्य चिन्ह धनुष्यबाण कुणाचा असा वाद रंगला आहे. न्यायालयामध्ये आज ही सुनावणी पूर्ण झाली असून पुढच्या शुक्रवारी या प्रकरणावर निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: Shivsena : निवडणुक आयोगावर शंभुराज देसाईंचा दृढ विश्वास म्हणाले, धनुष्यबाण चिन्ह ...