Lalit Patil Arrested : 'अखेर ललित पाटील पोलिसांच्या स्वाधीन, पण...'; सुषमा अंधारेंची पोस्ट चर्चेत

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला चेन्नई येथून अटक करण्यात आले आहे.
Shivsena UBT leader Sushama Andhare post after drugs Mafiya Lalit Patil Arrest marathi political news
Shivsena UBT leader Sushama Andhare post after drugs Mafiya Lalit Patil Arrest marathi political news
Updated on

पुण्यातील ससून रुग्णालयातून पळालेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अखेर अटक केली आहे. १५ दिवसांपासून ललित पाटील फरार होता. त्याच्या तपासासाठी १० पोलीस पथके देखील नेमण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ललित पाटील याला चेन्नईतून अटक केली आहे.

यापूर्वी ललित पाटील प्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर आज दुपारी ललित पाटील याला पुण्यात आणलं जाणार असून त्यानंतर कोर्टात सादर केलं जाणार आहे. यादरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर एक पोस्ट केली असून यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

सुषमा अंधारे यांनी त्याच्या पोस्ट मध्ये "अखेर ललित पाटील पोलिसांच्या स्वाधीन... पण..." इतकचं म्हटलं आहे. मात्र आता ललित पाटील सापडल्यानंतर त्याच्या चौकशीत कुठले खुलासे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shivsena UBT leader Sushama Andhare post after drugs Mafiya Lalit Patil Arrest marathi political news
Israel Hamas War : गाझा रुग्णालयावरील हल्ल्यात ५०० ठार! नेतान्याहू म्हणाले, इस्रायल नव्हे त्यांचंच रॉकेट...

अंधारेंचे गंभीर आरोप

ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले आहेत. शिंदे सरकारमधील मंत्र भुसे यांनी फोन करुन ललित पाटीलला ससूनमध्ये पाठवण्यास सांगितल्याचा आरोप त्यांनी केला होता.तसेच त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासावेत अशी मागणीही अंधारे यांनी केली होती. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहयला मिळालं होतं.

दादा भुसेंचं उत्तर

या आरोपांवर उत्तर देताना दादा भुसे यांनी आरोपांचे खंडन केलं. तसेच खुशाल चौकशी करा, पण जर काही सापडले नाही तर माफी मागा असे प्रतिआव्हान सुषमा अंधारे यांन दिले होते.

Shivsena UBT leader Sushama Andhare post after drugs Mafiya Lalit Patil Arrest marathi political news
Lalit Patil Arrested : मोठी बातमी! ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला अखेर चेन्नईमधून अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com