Shiv Sena: मी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणार; उद्धव ठाकरेंनी घेतली शपथ

cm uddhav thackeray
cm uddhav thackeray google

मी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणार असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला आहे. सदस्य नोंदणी करा कागदांची लढाई हारता कामा नये असंही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सांगितलं आहे. मातोश्रीवर उरणच्या शिवसैनिकाशी संवाद साधताना ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे.(shivsena Uddhav Thackeray cm will again in m maharashtra politics)

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिवसेना संपवण्याचा ज्या ज्या वेळी प्रयत्न होतो, त्यावेळी शिवसेना आघात करणाऱ्याला गाडून चार पटीने उभी राहते. चिन्हा गोठवले, नाव गोठवले पण रक्त पेटवले. हे सळसळणारे रक्त समोरच्याला राजकारणात जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

जे मी शिवतीर्थावरती बोललो ते आजही बोलणार आणि उद्याही बोलत राहणार आहे. दसरा मेळाव्यात एका बाजूला गोळा केलेली माणसे होती. तर दुसऱ्या बाजूला स्वत:हून आलेली तापलेल्या रक्ताची निष्ठावंत माणसे होती, असा टोला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.

तसेच, नुसत्या घोषणा देऊन चालणार नाही. घराघरात मशाल पोहचवण्याचे काम तुम्हाला करायचे आहे. अजूनही सदस्य नोंदणी सुरू ठेवा. ही लढाई कागदाची आहे, यात आपण हरता कामा नये, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं.

काही शिवसैनिकांना कॅनडा ब्रिटनहून फोन आले. ते आश्चर्यकारक होते. ते म्हणाले की आम्ही इथं बसून दसरा मेळावा बघत होतोच. पण आमचे तिकडचे मित्रही दसरा मेळावा बघत होते. आम्ही त्यांना ट्रान्सलेट करून सांगत होतो. जगभरात दसरा मेळाव्याचे चित्र गेले आहे. फक्त गोळा करुन आणलं आणि ताकद दाखवली असं आपण केले नाही. आपल्या दसरा मेळाव्यात जिवंतपणा होता, असंही त्यांनी म्हटलं असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com