Dasara Melava"...तर त्यांचा कोथळा काढल्याशिवाय राहायचं नाही"; शिवसेनेचा आणखी एक टीझर लॉन्च

Shivsena Uddhav Thackeray dasara melava shivaji park New teaser release
Shivsena Uddhav Thackeray dasara melava shivaji park New teaser releaseesakal
Updated on

शिवसेनेचा दसरा मेळावा 5 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 6.30 वाजता शिवतिर्थावर होणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असतानाच आता या मेळाव्याचा दुसरा टीझर रिलीज करण्यात आला आहे. अंगावर रोमांच उभा करणारा हा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर काही मिनिटातच त्याला तुफान प्रतिसाद मिळाला आहे.(Shivsena Uddhav Thackeray dasara melava shivaji park New teaser release)

यापूर्वी, 30 सप्टेंबरला शिवसेनेतर्फे पहिला टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. ‘निष्ठेचा सागर उसळणार… भगवा अटकेपार फडकणार… महाराष्ट्राची ताकद दिसणार…’ अशी वाक्य स्क्रीनवर झळकतात आणि मग ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो…’ असे अंगावर रोमांच उभे करणारे शब्द कानावर पडतात. आता दुसरा टीझर लॉन्च करण्यात आला आहे.

दरम्यान, शिवसेनेने दुसरा टीझर लॉन्च केला आहे. त्यांच्या सभांचे व्हिडीओ, रोखठोख भाषण टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे यांनीदेखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. एक नेता, एक झेंडा, एक मैदान... शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा, शिवाजी पार्क दादर येथे, असे ट्विट शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन करण्यात आले आहे. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांनीही हा टिझर शेअर करत शिवसैनिकांना आवाहन केलं आहे. वाजत गाजत, गुलाल उधळत या... पण शिस्तीत या!, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Drugs
sangola, shelakewadi zp school
Deccan Police have registered a case after an unemployed youth was allegedly cheated of Rs 20 lakh on the promise of a government job in Pune.
Speaking at Sakal Bhakti Shakti Vyaspeeth, Dr More highlighted the contribution of saints in shaping Maharashtra's social and cultural legacy.
Marathi News Esakal
www.esakal.com