
शिवसेनेचा आज ५९ वा वर्धापन दिन आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोन्ही पक्षांकडून आज वर्धापन दिन साजरा केला जात आहे. वर्धापन दिनानिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून नाबाद ५९ म्हणत शिंदेंसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना शतायुषी होईल. मराठी बाणा कायम राखण्यासाठी घाव झेलून लढायला शिवसेना तयार आहे. पण शिवसेना कदापि गुजरात व्यापारी पॅटर्नपुढे झुकणार नाही असं अग्रलेखात म्हटलं आहे.