शिवस्मारक समुद्रात नको 

शिवस्मारक समुद्रात नको 

मुंबई -  छत्रपती शिवाय महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पायाभरणीला गालबोट लागल्यानंतर भर समुद्रात शिवस्मारक नको, अशी मागणी आग्रहाने पुढे येऊ लागली आहे. शिवस्मारक राजभवन परिसरात उभारले जावे, अशी मागणी मराठा सेवा संघाने केली आहे. 

मराठा सेवा संघाने सुरवातीपासून शिवस्मारकाची समुद्राऐवजी जमिनीवर असावा, असा आग्रह धरला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सर्व राजकीय पक्षांचे राजकारण आहे. अरबी समुद्रात शिवस्मारक करण्यासाठी आपण अनावश्‍यक स्पर्धा करत असल्याची टीका महासंघाने केली आहे. शिवस्मारक मुंबई येथील राजभवन येथे उभारून हा मुद्दा भावनिक न बनवता व्यवहारिक पर्याय म्हणून त्याकडे पाहावे. स्मारक जमिनीवर असल्यास दररोज सकाळी 8 ते रात्री 8 उघडे राहू शकते. तिकीट दर 5-10 रुपये वा मोफत प्रवेश असू शकतो. शिवाय अपघातही टळतील. दैनंदिन देखभाल खर्च नगण्य राहील. सामान्यांना सहज शिवस्मारक पाहता येईल. स्थानिक सामान्य लोकांना रोजगार मिळेल आणि मासेमारी करणाऱ्यांच्या अडचणीही कमी होतील, असा दावा महासंघाने केला आहे 

शिवस्मारक समुद्रात उभे केल्यास अनुभव पाहता दरवर्षी सुमारे 4-5 महिने समुद्रात निर्माण होणारे लाटांचे वादळ यामुळे बंद करावे लागेल. तसेच दररोज भरती-ओहोटीच्या वेळा लक्षात घ्याव्या लागतील. म्हणजेच वेळ कमी पडेल, असा दावा महासंघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com