धक्कादायक! आरटीओने तपासलेल्या २१४ पैकी ४३ ट्रॅव्हल्समध्ये अग्निशमन यंत्रच नव्हते; संकटकालीन दरवाजेही लॉक

तपासलेल्या २१४ पैकी ४३ ट्रॅव्हल्समध्ये अग्निशमन यंत्रेच नव्हती. काही यंत्रे मुदतबाह्य झाली होती. इमर्जन्सी दरवाजे कायमचे लॉक होते. ३३ गाड्यांमध्ये प्रथमोपचाराची सोय नव्हती. ९४ गाड्यांवर कारवाई करीत आरटीओच्या अधिकाऱ्यांनी ३,३२,७०० रुपयांचा दंड आकारला.
fire extinguisher expired
fire extinguisher expiredsakal

सोलापूर : समृद्धी महामार्गावरील दुर्घटनेनंतर सोलापूर ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांनी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोल नाका, बार्शी रोड, मंगळवेढा रोडवरून पुणे-मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसगाड्यांची पडताळणी केली. त्यावेळी धक्कादायक बाबी समोर आल्या. तपासलेल्या २१४ ट्रॅव्हल्सपैकी ४३ गाड्यांमध्ये अग्निशमन यंत्रेच नव्हती. काही यंत्रे मुदतबाह्य झाली होती. नऊ ट्रॅव्हल्सचे इमर्जन्सी दरवाजे कायमचे लॉक होते. ३३ गाड्यांमध्ये प्रथमोपचाराची सोय नव्हती. ९४ गाड्यांवर कारवाई करीत आरटीओच्या अधिकाऱ्यांनी तीन लाख ३२ हजार ७०० रुपयांचा दंड आकारला.

राज्यातील रस्ते अपघातात दरवर्षी सरासरी १३ हजार जणांचा (दररोज ३५) मृत्यू होत आहे. नाशिक, पुणे, मुंबई, बीड, सातारा, नागपूर, सोलापूर, बीड, जळगाव या जिल्ह्यांमध्ये अपघात व अपघाती मृत्यूचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

सोलापूर जिल्हा पहिल्या पाचमध्ये आहे. महामार्ग पोलिस, स्थानिक पोलिस व आरटीओच्या माध्यमातून कारवाई होत असतानाही वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांची संख्या लक्षणीय आहे. दरवर्षी बेशिस्त वाहन चालकांना सरासरी अठराशे कोटींचा दंड होतो, तरीपण अपघात कमी झालेले नाहीत. समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर ट्रॅव्हल्सला लागलेल्या आगीत ३५ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अशा घटना पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी आता शासकीय यंत्रणांकडून घेतली जात आहे.

शनिवारी आरटीओ अधिकाऱ्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सची पडताळणी केली. त्यावेळी आपत्कालीन दरवाजा, योग्यता प्रमाणपत्र, अग्निशमन यंत्रणा, स्पीड गव्हर्नर, लाईट्‌स, इंडिकेटर, चालकाचा गणवेश, बॅकलाईट, रिफ्लेक्टर, हॉर्न, बसमधील प्रवासी क्षमता या बाबींची खात्री केली. त्यावेळी धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली.

आरटीओ कारवाईचे स्वरूप

  • ट्रॅव्हल्स तपासणी

  • २१४

  • अग्निशमन यंत्र नाही

  • ४३

  • इमर्जन्सी दरवाजा कुलूपबंद

  • ११

  • प्रथमोपचार सोय नाही

  • ३७

तेरा अधिकाऱ्यांच्या पथकाची कारवाई

सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सहायक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, अमरसिंह गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक शिरीष पवार, शीतलकुमार कुंभार, सहायक मोटार वाहन निरीक्षक अमोल घुले, बाबू तेली, तेजस मखरे यांच्या पथकाने सावळेश्वर टोल नाक्यावर जवळपास ८६ ट्रॅव्हल्सची तपासणी केली. तर बार्शी बायपासवर मोटार वाहन निरीक्षक किरण गोंधळे, राहुल खंदारे, सहायक मोटार वाहन निरीक्षक तेजस्विनी वायचळ, अजित कदम यांनी ९० ट्रॅव्हल्सची आणि मंगळवेढा रोडवरील इंचगाव टोल नाक्यावर मोटार वाहन निरीक्षक शिरीष तांदळे, अविनाश अंभोरे, सहायक मोटार वाहन निरीक्षक ऐश्वर्या धल्लु व बाळासाहेब सलगर यांच्या पथकाने ३८ ट्रॅव्हल्सची तपासणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com