धक्कादायक वास्तव! सव्वादोन वर्षांत रस्ते अपघातात 32590 जणांनी गमाविला जीव, 42 हजार गंभीर जखमी; 70 हजारांवर रेकॉर्ड ब्रेक अपघात; ‘ही’ आहेत प्रमुख कारणे

जानेवारी २०२२ ते मार्च २०२४ या सव्वादोन वर्षांत राज्यातील विविध रस्त्यांवर तथा महामार्गांवर रेकॉर्डब्रेक ७० हजार ६२६ अपघात झाले. त्यात तब्बल ३२ हजार ५९० जणांचा मृत्यू झाला असून ४२ हजार जणांना अपंगत्व आल्याची नोंद महामार्ग पोलिसांकडे झाली आहे.
sakal exclusive
sakal exclusivesakal

सोलापूर : राज्यात रस्त्यांची कनेक्टिव्हिटी वाढली, रस्ते चकाचक झाले, पण वाहनांचा वेग व नियमांचे पालन करणाऱ्या चालकांची संख्या खूपच कमी असल्याची वस्तुस्थिती आहे. जानेवारी २०२२ ते मार्च २०२४ या सव्वादोन वर्षांत राज्यातील विविध रस्त्यांवर तथा महामार्गांवर रेकॉर्डब्रेक ७० हजार ६२६ अपघात झाले. त्यात तब्बल ३२ हजार ५९० जणांचा मृत्यू झाला असून ४२ हजार जणांना अपंगत्व आल्याची नोंद महामार्ग पोलिसांकडे झाली आहे.

नाशिक, नगर, ठाणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, बीड, यवतमाळ, धाराशिव, बीड या जिल्ह्यांमध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक अपघात व अपघाती मृत्यूची नोंद आहे. अपघात होऊ नयेत, जखमींना तत्काळ उपचार मिळावेत यादृष्टीने शासनाच्या उपाययोजना कागदावरच आहेत.

दंडात्मक कारवाई, अपघातप्रवण ठिकाणी उपाययोजना, महामार्गांवरील जनजागृतीचे फलक लावणे, महामार्गांवरील विजेचे खांब बाजूला करणे, संरक्षित लोखंडी जाळी, खड्ड्यांची डागडुजी, महामार्गांवरील बंद वाहने तत्काळ बाजूला करणे या गोष्टी करणे गरजेचे आहे. दुसरीकडे वाहन चालकांकडूनही नियमांचे पालन होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. पण, महामार्ग झाल्यानंतर पूर्वीचे प्रवासी थांबे होते ते सर्व्हिस रोडला घेतले आहेत, मात्र तिकडून वाहने येत नसल्याने प्रवाशांना महामार्गांवरच थांबावे लागते, अशी सद्य:स्थिती आहे.

रस्ते अपघाताची स्थिती

  • सन अपघात मृत्यू गंभीर जखमी

  • २०२२ ३३,३८३ १५,२२४ १९,५४०

  • २०२३ ३५,२४३ १५,३६६ २१,४४६

  • एकूण ६८,६२६ ३०,५९० ४०,९८६

समोरून-मागून धडकून साडेसात हजार मृत्यू

रस्ते अपघाताला प्रमुख कारणे म्हणजे वाहनांचा अमर्याद वेग, बेशिस्तपणे थांबलेली रस्त्यांवरील वाहने, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी किंवा मालाची वाहतूक, सलग ड्रायव्हिंग, सिटबेल्ट, हेल्मेटचा वापर नाही, मद्यपान करून वाहन चालविणे अशीच आहेत. दोन वर्षांत ‘हिट ॲण्ड रन’च्या अपघातात तीन हजार ७२३ तर मागून धडक होऊन तीन हजार ८५९ जणांचा मृत्यू झाल्याचे महामार्ग पोलिसांकडील माहितीवरून समोर आले आहे.

तीनपेक्षा अधिक मृत्यूचे अपघात वाढले

अपघातात एक-दोन मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहेच, पण काही महिन्यांत एकाचवेळी तीन पेक्षा अधिक जणांचा मृत्यू होण्याऱ्या अपघातात मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. ई-चालानच्या माध्यमातून दरवर्षी ११०० ते १३०० कोटींचा दंड बेशिस्त वाहनांना होतोय. स्थानिक पोलिस, आरटीओ यांच्याकडूनही दंडात्मक कारवाई होते. तरीपण अपघात व अपघाती मृत्यू कमी झालेले नाहीत हे विशेष.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com