esakal | थांबायचं नाय गड्या, थांबायचंय नाय!

बोलून बातमी शोधा

devmanus shooting
थांबायचं नाय गड्या, थांबायचंय नाय!
sakal_logo
By
- अरुण सुर्वे

पुणे : राज्य सरकारने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी विविध निर्बंध लादले. त्यात चित्रीकरणासाठी परवानगी नाकारली. परिणामी, विविध वाहिन्यांनी मालिकांचे चित्रीकरण दुसऱ्या राज्यात सुरू केले आहे. त्यामुळे मागील लॉकडाउनप्रमाणे जुने नव्हे तर मालिकांचे पुढील नवीन भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’चा निर्णय घेऊन कठोर नियमावली केली आहे. मालिका, चित्रपटांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे घरात असलेल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी झी, स्टार प्लस, स्टार भारत, स्टार प्रवाह या वाहिन्यांनी सध्या सुरू असलेल्या मालिकांचे चित्रीकरण थेट दुसऱ्या राज्यात करण्याचा निर्णय घेतला असून तेथे सर्व कलाकार आणि टीम रवाना झाली आहे. तसेच, तेथे चित्रीकरणही सुरू झाले आहे.

सगळीकडे फक्त संचारबंदीच्याच बातम्या सुरू आहेत, या सर्व नकारात्मक गोष्टीतून बाहेर येण्यासाठी व प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी दुसऱ्या राज्यात मालिकांचे चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ‘झी टीव्ही’कडून सांगण्यात आले. सध्या, सोशल मीडियावर देखील परराज्यातील चित्रीकरण व कलाकारांचे मिम्स व्हायरल होत आहेत.

हेही वाचा: मासिक पाळी, गर्भवती, स्तनपान आणि लसीकरण; दूर करा गैरसमज

चित्रीकरण स्थळ आणि मालिका

१) गोवा : पाहिले न मी तुला

अग्गबाई सुनबाई, सुख म्हणजे नक्की काय असतं, रंग माझा वेगळा, ये हैं चाहते, गूम हैं किसी के प्यार मे, आप की नजरो ने समझा

२) दमण : येऊ कशी तशी मी नांदायला

३) सिल्वासा : माझा होशील ना, आई कुठे काय करते, स्वाभिमान, सहकुटुंब सहपरिवार, मुलगी झाली हो, सांग तू आहेस का, संतोषी मा, ये रिश्ते क्या केहलाते है

४) जयपूर : चला हवा येऊ द्या

५) हैदराबाद : मेहंदी हैं रचने वाली, ईमली

६) बेळगाव : देवमाणूस

७) अहमदाबाद : फुलाला सुगंध मातीचा

८) वापी : प्रतिग्या- 2

९) आग्रा : साथ निभाना साथीया- 2

महाराष्ट्रात चित्रीकरणासाठी काय अडचण?

  • जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी

  • चित्रीकरणासाठी परवानगी नाही

  • संचारबंदीमुळे कलाकार व इतर टीमला फिरता येत नाही

  • खाण्यापिण्याच्या सुविधांवर बंधने

हेही वाचा: Corona Update: पुणेकरांना सलग सातव्या दिवशी दिलासा!

परराज्यात काय सुविधा

  • कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी संचारबंदी, लॉकडाउन नाही

  • कोरोनाचे नियम पाळून

  • चित्रीकरणास परवानगी

  • संचारबंदी नसल्याने कलाकारांना एका ठिकाणाहून दुसरीकडे जाता येते

  • खाण्यापिण्याची सुविधा उपलब्ध

''महाराष्ट्रात चित्रीकरणासाठी परवानगी नाही. त्यामुळे दुसऱ्या राज्यात मालिकांचे चित्रीकरण करत आहोत. संपूर्ण टीमच्या आरोग्याची काटेकोर काळजी घेत चित्रीकरण सुरू आहे.''

- सतीश राजवाडे, कार्यक्रम प्रमुख, स्टार प्रवाह

हेही वाचा: पुण्यासाठी ३५ हजार लस उपलब्ध; सोमवारी लसीकरण सुरळीत होण्याची शक्यता