Shivsena : शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या अडचणी वाढणार? काय आहे प्रकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sada Sarwankar

Shivsena : शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या अडचणी वाढणार? काय आहे प्रकरण

गणपती विसर्जनाच्या दरम्यान शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटात दादर पोलीस ठाणे परिसरात मोठा राडा झाला होता. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला होता. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र, आपल्या बंदुकीतून गोळी सुटलीच नसल्याचा दावा सदा सरवणकर यांनी केला होता. या प्रकरणी बॅलेस्टिक तज्ज्ञांचा अहवाल समोर आला असून त्यामध्ये सरवरणकर यांच्याच बंदुकीतून गोळी सुटली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सरवणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

गणपती विसर्जनादिवशी शिंदे आणि ठाकरे गटात राडा झाला होता. यावेळी दोन्ही गटकडून एकमेकांविरोधात क्रॉस गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस ठाण्याबाहेर प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळी सुटली होती. त्यामुळे सरवणकर यांच्या विरोधात 15 सप्टेंबर रोजी आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण त्यांनी हा आरोप फेटाळला होता.

हे ही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

पोलिसांनी या प्रकरणी सदा सरवणकर यांची चौकशी देखील केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सरवणकर यांच्याकडील बंदूक जप्त करण्यात आली होती. बंदुकीसोबतच बंदुकीतून निघालेले काडतूसे आणि घटनास्थळावरून काही नमुने गोळा करण्यात आले होते. याची बॅलेस्टिक तज्ज्ञांनी चाचणी केली. त्यांच्या या अहवालामध्ये सरवणकर यांच्या बंदुकीतूनच गोळी सुटली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: Amol Kolhe : "दाढी काढली तर अमोल कोल्हेला कोणी ओळखणार पण नाही"