ज्येष्ठ विधीतज्ञ श्रीकांत शिवदे यांचे दीर्घ आजाराने निधन

फौजदारी खटल्यात निष्णात वकील म्हणून नावाजलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकांत शिवदे यांचे दीर्घ आजाराने बुधवारी (ता. १९) सकाळी निधन झाले.
श्रीकांत शिवदे
श्रीकांत शिवदेSakal
Updated on

पुणे : फौजदारी खटल्यात निष्णात वकील म्हणून नावाजलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकांत शिवदे यांचे दीर्घ आजाराने बुधवारी (ता. १९) सकाळी निधन झाले. ते वय ६४ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. (Shrikant Shivde Death)

त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. बांद्रा येथील हीट अँड रन प्रकरणात अ‍ॅड. शिवदे यांनी अभिनेता सलमान खानची बाजू मांडली होती. कुख्यात गुंड छोटा शकीलला मदत केल्याप्रकरणी हिरे व्यापारी भरत शहा यांच्याविरुद्ध दाखल असलेला खटला ॲड. शिवदे यांनी लढविला होता. तसेच दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यावर बलात्काराच्या प्रकरणात त्यांनी भांडारकर यांचा बचाव केला होता. मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी लेफ्टनंट प्रसाद पुरोहित यांचे ते वकील होते.

श्रीकांत शिवदे
नंबर एक कोण? चंद्रकांत पाटलांना परबांचं प्रत्युत्तर

ॲड. शिवदे यांनी इंडियन लॉ सोसायटीच्या (आयएलएस) लॉ स्कूलमधून कायद्याचे शिक्षण घेतले. त्यांनी १९८५ पासून प्रॅक्टिस सुरू केली. अ‍ॅड. शिवदे यांनी ज्येष्ठ विधीज्ञ विजयराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आपला वकिली व्यवसाय सुरु केला. खासदार वंदना चव्हाण, अ‍ॅड. हर्षद निंबाळकर, अ‍ॅड. विराज काकडे, अ‍ॅड. विजय सावंत यांच्यासमवेत यांनी एकत्रित काम केले. ते पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील होते. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात अ‍ॅड. शिवदे यांनी डीएसके यांच्या वतीने कामकाज पाहिले.

ॲड. शिवदे यांनी बचाव पक्षाकडून चालवलेली काही महत्त्वाची प्रकरणे

  • - अभिनेता सलमान खान हीट अँड रन प्रकरण

  • - शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी

  • - कुख्यात गुंड छोटा शकीलला मदत केल्याप्रकरणी हिरे व्यापारी भरत शहा यांच्याविरुद्ध दाखल गुन्हा

  • - दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यावर बलात्काराच्या प्रकरणात दाखल गुन्हा

  • - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याविरुद्ध दाखल खटला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Drugs
sangola, shelakewadi zp school
Deccan Police have registered a case after an unemployed youth was allegedly cheated of Rs 20 lakh on the promise of a government job in Pune.
Speaking at Sakal Bhakti Shakti Vyaspeeth, Dr More highlighted the contribution of saints in shaping Maharashtra's social and cultural legacy.
Marathi News Esakal
www.esakal.com