Sindhudurg District Bank: नारायण राणेंचे पुन्हा धक्कातंत्र; मनीष दळवींना अध्यक्षपदाची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sindhudurg

नारायण राणेंचे पुन्हा धक्कातंत्र; मनीष दळवींना अध्यक्षपदाची संधी

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा बँक (Sindhudurg District Bank Election)अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड आज होत असून सकाळी ११ वाजल्यापासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. यासाठी भाजपचे सर्व ११ सदस्य निवडणूक सभागृहात दाखल झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे चार संचालक दाखल झाले आहेत. भाजपच्यावतीने मनीष दळवी (Manish Dalvi) यांनी अध्यक्ष पदासाठी व उपाध्यक्ष पदासाठी अतुल काळसेकर (Atul Kalsekar) यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे भाजप नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा धक्कातंत्र वावरत प्रबळ दावेदार असलेल्या अतुल काळसेकर यांना उपाध्यक्ष पदी ढकलत मनीष दळवी यांना अध्यक्ष पदाची संधी दिली आहे.

हेही वाचा: नारायण राणे कोणाच्या गळ्यात घालणार माळ; अध्यक्ष पदासाठी दोघे दावेदार

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३० डिसेंबर रोजी मतदान झाले हिते. ३१ रोजी मतमोजणी झाली होती. यावेळी भाजप अकरा तर महाविकास आघाडी आठ संचालक निवडून आले होते. त्यामुळे भाजपचे बहुमत सिद्ध झाले होते. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. केंद्रीयमंत्री नारायण राणे कोणाला संधी देतात ? याची उत्सुकता होती. त्यासाठी केंद्रीयमंत्री राणे यांनी बुधवारी सर्व संचालकांची बैठक घेतली होती. मात्र, नावे जाहीर केली होती.

आज सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँक प्रधान कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी ११ वाजल्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ सुरू झाली आहे. त्यानुसार भाजप कडून मनीष दळवी यांनी अध्यक्ष पदासाठी तर अतुल काळसेकर यांनी उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. अतुल काळसेकर यांचे अध्यक्ष पदासाठी नाव आघाडीवर होते. मात्र, नारायण राणे यांनी पुन्हा धक्कातंत्र वापरत मनीष दळवी याना संधी दिली आहे. तर अतुल काळसेकर यांना उपाध्यक्ष पदासाठी संधी दिली आहे.

भाजपने बहुमत असताना उमेदवारी दाखल केली. बहुमत नसलेल्या महाविकास आघाडीने सुद्धा अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे व्हिक्टर डांटस तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या सुशांत नाईक यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत सुद्धा चुरस निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top