प्रज्ञा सातव यांचा विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल | Pradnya Satav | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pradnya Satav Filed Nomination For MLC Bypoll 2021
प्रज्ञा सातव यांचा विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

प्रज्ञा सातव यांचा विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

sakal_logo
By
गणेश पिटेकर

औरंगाबाद : विधानपरिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) उमेदवार डाॅ. प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांनी मुंबईत आज मंगळवारी (ता.१६) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. सातव यांची लढत भाजप उमेदवार संजय केनेकर यांच्याशी होणार आहे. केनेकर यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस उमेदवार रणपिसे यांच्या निधनाने विधानपरिषदेची एक जागा रिक्त झाली आहे. त्यासाठी पोटनिवडणूक होत आहे. (Legislative Council Bypoll 2021)

हेही वाचा: 'मोदी सरकारला चीनकडून अपमानित व्हायला आवडते, त्याची सवय झालीय'

उमेदवारी अर्ज दाखल करताना डाॅ प्रज्ञा सातव यांच्याबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. महाविकास आघाडीकडे बहुमत असल्याने सातव यांचा विजय निश्चित मानला जात आहे. डाॅ. प्रज्ञा सातव या दिवंगत काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत.

loading image
go to top