विषारी दारू प्याल्याने सहा जणांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

नगर - जिल्हा परिषद निवडणुकीतील दिवसभरातील प्रचारानंतर पांगरमल (ता. नगर) येथे रविवारी (ता. 12) झालेल्या पार्टीत देशी दारू प्यायल्याने चार जणांचा सोमवारी (ता.13) रात्री मृत्यू झाला. उपचार सुरू असलेल्या 15 जणांपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत शिवसेनेच्या उमेदवारांसह सहा जणांविरुद्ध आज गुन्हा दाखल झाला. दारूमध्ये विष होते, की अन्य कारणामुळे हा प्रकार घडला, याचा तपास पोलिस करीत आहेत. 

जेऊर (ता. नगर) गटातील उमेदवाराचा प्रचार करून आल्यानंतर रविवारी (ता.12) रात्री पांगरमल येथे पार्टी झाली. त्यात सर्वांना दारू देण्यात आली होती. पार्टी संपल्यानंतर घरी गेलेल्या सर्वांना अस्वस्थ वाटू लागले. काही जण बेशुद्ध झाले होते. त्यांना काल जिल्हा रुग्णालय व शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. त्यांतील चार जणांचा काल रात्री मृत्यू झाला. पाच जण अत्यवस्थ आहेत. 

सहा जणांविरुद्ध गुन्हा 
बबन रंगनाथ आव्हाड यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, जेऊर गटातील शिवसेनेच्या उमेदवार डॉ. भाग्यश्री मोकाटे, पंचायत समितीचे सदस्य गोविंद मोकाटे (रा. इमामपूर), पंचायत समितीच्या शिवसेनेच्या उमेदवार मंगल आव्हाड, भीमराव गेणू आव्हाड, रावसाहेब गेणू आव्हाड, महादेव किसन आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी मंगल आव्हाड यांच्या घरासमोर सर्वांना देशी दारू पाजल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, पांगरमल येथील घटनेसारखाच प्रकार नगर तालुक्‍यात दोन ठिकाणी चार दिवसांपूर्वी घडल्याची चर्चा आहे.

Web Title: Six people died of poisonous alcohol