सोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

चाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर परिषदेच्या हद्दवाढीत सोळा ग्रामपंचायतींचा समावेश नको, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्‌वारे करण्यात आली. 

चाकण (ता. खेड) येथील औद्योगिक वसाहतीतील सावरदरी (ता. खेड) येथील फिलिप्स इंडिया लिमिटेड कंपनीतील हेल्थ केअर सुविधेच्या उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्री फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई आले होते. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा ताफा कंपनीच्या बाहेर जाताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यातच मुख्यमंत्र्यांना हातवारे करून थांबण्याची विनंती केली. या वेळी मुख्यमंत्री फडणवीसांचा ताफा थांबला मुख्यंमंत्री वाहनाच्या बाहेर आले व कार्यकर्त्यांची निवेदने घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. 

मेक इन इंडियाअंतर्गत हा कार्यक्रम होता तसे कंपनीच्या प्रवेश द्वारावर फलक लावले होते. या वेळी मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे, भोसरीचे आमदार महेश लांडगे आदी उपस्थित होते. या वेळी चाकण औद्योगिक वसाहतीतील पाचवा टप्पा लवकर व्हावा, या मागणीचे निवेदनदेखील मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. भाजपचे कालीदास वाडेकर, अशोक मांडेकर, नंदकुमार गोरे, राजेंद्र खरमाटे व इतर उपस्थित होते.

विरोधाची दखल घेऊ : मुख्यमंत्री
सोळा गावांच्या सरपंचांचा नगर परिषदेच्या हद्दवाढीत समावेशाला विरोध असल्याचे नगर परिषद हद्दवाढविरोधी कृती समितीचे प्रमुख माजी सरपंच रामदास मेदनकर, आंबेठाणचे सरपंच दत्तात्रेय मांडेकर, भाजपच्या क्रांती सोमवंशी, खराबवाडीचे सरपंच जीवन खराबी आदींनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गावांचा विरोध असेल तर नगर परिषदेच्या हद्दीत समावेश करून देणार नाही, असे आश्‍वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com