सव्वातीन लाख शेतकरी मुलांना कौशल्य प्रशिक्षण (व्हिडीओ)

नवी दिल्ली - महाराष्ट्र सरकारचा कौशल्य विकास विभाग आणि "सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर व पॅलेडियम कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' यांच्यात गुरुवारी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार झाला.
नवी दिल्ली - महाराष्ट्र सरकारचा कौशल्य विकास विभाग आणि "सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर व पॅलेडियम कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' यांच्यात गुरुवारी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार झाला.

मुंबई - राज्यातील शेतकरी आणि तरुणांसाठी स्वयंरोजगार; तसेच व्यवसायाकरिता संधी निर्माण होण्यासाठी जवळपास सव्वातीन लाख शेतकरी मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली.

नवी दिल्ली येथे आज पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकारचा कौशल्य विकास विभाग आणि पॅलेडियम कन्सल्टिंग इंडियाचे बार्बरा सुराटी व सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरचे बॉबी निंबाळकर यांच्यात सामंजस्य करार झाला. या वेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य सोसायटीचे सहसचिव राजेश अग्रवाल, मिशन समन्वयक पवार उपस्थित होते.

प्रगत तंत्रज्ञानाधारित शेती पद्धतीद्वारे राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांना यशस्वी उद्योजक बनविण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2.0 अंतर्गत कृषी क्षेत्राशी संबंधित विशेष प्रकल्प राबविण्याकरिता राज्य शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत राज्यातील शेतकरी; तसेच कृषी क्षेत्रामध्ये कार्य करण्यास इच्छुक असलेल्या युवक युवतींकरिता महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

प्रशिक्षण उपक्रमामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि प्रयोगशील शेतीबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण उपक्रमामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि प्रयोगशील शेतीबाबतची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. शेती प्रशिक्षणादरम्यान शेतकरी बांधवांना पीक घेताना नेमके काय प्रयोग करणे आवश्‍यक आहे, याबाबत माहिती मिळण्यास मदत होणार आहे. सामूहिक शेतीमधील प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांना शेती करताना दडपण वाटू नये आणि शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी प्रयत्न असणार आहे. शेतकऱ्यांना कृषीआधारित कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्यामुळे गावामध्येच रोजगारनिर्मिती होण्याबरोबरच शेतकऱ्यांचा कुटुंबातील तरुण-तरुणींना याचा लाभ होण्यास मदत होणार आहे. मोफत देण्यात येणारे प्रशिक्षण 34 जिल्ह्यांत टप्प्याटप्प्याने होणार असून, याअंतर्गत शेतीसाठी उपयोगात येणाऱ्या उपकरणाच्या दुरुस्तीचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com