स्मार्ट सिटी मंजुरीसाठी "एक खिडकी योजना' 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

मुंबई - महाराष्ट्रात होणाऱ्या स्मार्ट सिटी प्रकल्पामधील गुंतवणुकीचे आम्ही स्वागतच करू. स्मार्ट सिटीसाठीच्या प्रकल्पांना सामायिक अर्जावर आणि एक खिडकी योजनेच्या माध्यमातून मंजुरी देतानाच स्पर्धाक्षम आणि गुणवत्ता या निकषांच्या आधारावर पारदर्शक आणि निष्पक्षपातीपणे प्रकल्पांची निवड केली जाईल, असे राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी स्पेन, बार्सिलोना येथे सुरू असलेल्या "स्मार्ट सिटी एक्‍स्पो वर्ल्ड कॉंग्रेस' मध्ये आयोजित कार्यक्रमात सांगितले. 

भारतातील विविध राज्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी केले आहे. बार्सिलोना येथील जागतिक परिषेदेतील "मेक इन इंडिया' दालनाचे उद्‌घाटन क्षत्रिय यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. स्मार्ट सिटी एक्‍स्पो जागतिक परिषदेमध्ये राज्याच्या शिष्टमंडळाने बेल्जिअमच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबत चर्चा केली. भारतात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत असलेल्या प्रकल्पांबाबत मुख्य सचिवांनी बेल्जिअमच्या शिष्टमंडळाला माहिती दिली. पुणे आणि नागपूर महापालिका आयुक्तांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत बेल्जिअमच्या सहकार्याविषयी चर्चा केली. 

स्मार्ट सिटी प्रकल्पांत महाराष्ट्राने घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत करतानाच बेल्जिअम शिष्टमंडळाचे प्रमुख टॅंग जि लेस्ट्रे यांनी सुरक्षा, अपारंपरिक ऊर्जा आणि माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात बेल्जिअम तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी उत्सुक असल्याचे या वेळी सांगितले. 

गुंतवणूकदारांच्या परिसंवादात क्षत्रिय म्हणाले की, देशात औद्योगिक गुंतवणूक वाढीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने "इज ऑफ डुईंग बिझनेस'वर भर दिला आहे. स्मार्ट सिटी विकसित करण्यासाठी या क्षेत्रातील जागतिक दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत भारतात शाश्वत, सुरक्षित स्मार्ट शहरे विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील स्मार्ट सिटी प्रकल्पांना सामाईक अर्जाच्या माध्यमातून एक खिडकी योजनेद्वारे मंजुरी दिली जाईल. महाराष्ट्राच्या शिष्टमंडळात पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, नागपूर महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, माहिती व तंत्रज्ञान संचालक शंकरनारायणन, नागपूरचे पोलिस उपायुक्त इशू संधू यांचा समावेश आहे.

Web Title: Smart City approval of the one window plan