राज्यात धूम्रपान घटले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

मुंबई - धूम्रपान, तंबाखू सेवन या संदर्भात करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात महाराष्ट्रासाठी आशादायी चित्र आहे. या सर्व्हेक्षणानुसार महाराष्ट्रात अवघे 3.8 टक्के इतके धूम्रपानाचे अल्प प्रमाण आहे. दुसरीकडे तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्याला अजून मोठा टप्पा पार करावा लागणार आहे. 

मुंबई - धूम्रपान, तंबाखू सेवन या संदर्भात करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात महाराष्ट्रासाठी आशादायी चित्र आहे. या सर्व्हेक्षणानुसार महाराष्ट्रात अवघे 3.8 टक्के इतके धूम्रपानाचे अल्प प्रमाण आहे. दुसरीकडे तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्याला अजून मोठा टप्पा पार करावा लागणार आहे. 

केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य मंत्रालय, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आणि जागतिक आरोग्य संघटनांच्या मदतीने ग्लोबल ऍडल्ट टोबॅको सर्व्हेक्षण (जीएएसटी-2) करण्यात आले होते. यानुसार तंबाखू सेवनात देशभरात सहा टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. महाराष्ट्र हे देशभरातील सर्वात कमी (3.8) धूम्रपान करणारे राज्य ठरले आहे; तर तंबाखूजन्य पदार्थात राज्याची अद्यापही समाधानकारक परिस्थिती नाही. राज्यातील 24.4 टक्के लोक यामध्ये अडकले आहेत. 

तंबाखू सेवन घटले? 
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य पाहणीच्या अहवालानुसार, राज्यातील तंबाखू सेवनाचे पुरुष व महिलांचे प्रमाण घटल्याने तंबाखू वापरावर नियंत्रण आल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. 2005-06 मध्ये पुरुषांचे तंबाखू सेवनाचे प्रमाण 48.3 टक्के होते; तर 2015-16 मध्ये हे प्रमाण 36.6 टक्के होते. स्त्रियांचे तंबाखू सेवनाचे प्रमाण 2005-06 मध्ये 10.5 टक्के होते. त्यामध्ये 2015-16 मध्ये मोठी घसरण होऊन 5.8 टक्‍क्‍यांवर आले. 

सिगारेटवर अधिक खर्च 
ग्लोबल ऍडल्ट टोबॅको सर्व्हे (जीएसटी1) अहवालात सिगारेटसाठी या व्यसनात अडकलेली व्यक्ती महिन्याला 399 रुपये खर्च करत होती. तर जीएसटी 2 नुसार ती व्यक्ती महिन्याला 1 हजार 192 रुपये खर्च करते. विडीचे व्यसन असलेली व्यक्ती जीएसटी 1 च्या अहवालातील महिन्याला 93 रुपये खर्च करत होती; तर जीएसटी 2 मध्ये 284 रुपये खर्च करीते. 

जीएएसटी- 2 वर नजर 
- महाराष्ट्रात धूम्रपानाचे केवळ 3.8 टक्के प्रमाण 
- तंबाखूजन्य पदार्थ्यांचे सेवन करण्याचे महाराष्ट्रात 24.4 टक्के प्रमाण असल्याने इतर राज्यांच्या तुलनेत 21 व्या स्थानावर 
- धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थ व्यसनाचे महाराष्ट्रात मोठे प्रमाण आहे. त्यामुळे हे राज्य 19 व्या स्थानावर आहे. 

Web Title: smoking less in the maharashtra state