Smriti Mandhana–Palash Muchhal Wedding Postponed
esakal
महाराष्ट्र बातम्या
स्मृती मंधाना अन् पालाश मुच्छलचा विवाह ७ डिसेंबरला होणार? कुटुंबातील सदस्याने दिली महत्त्वाची अपडेट...
Smriti Mandhana–Palash Muchhal Wedding Postponed : दोघांच्या विवाहासंदर्भात सोशल मीडियावर अनेक अप्रमाणित दावे, व्हायरल चॅट्स आणि अफवा पसरल्या जात आहेत. अशातच आता ७ डिसेंबर रोजी हा होणार असल्याचं सांगितलं जातं आहे. याबाबत स्मृतीच्या भावाने स्पष्टीकरण दिलं आहे.
Smriti Mandhana–Palash Muchhal Wedding: भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि म्युझिक कम्पोझर पालाश मुच्छल यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. २३ नोव्हेंबर रोजी विवाह होणार होता. मात्र, ऐन लग्नाच्या दिवशी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडली. त्यामुळे हा विवाह सोहळा स्थगित करण्यात आला. विशेष म्हणजे त्यानंतर सोशल मीडियावर अनेक अप्रमाणित दावे, व्हायरल चॅट्स आणि अफवा पसरल्या. अशातच आता ७ डिसेंबर रोजी हा होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.
