मेंढापुरात रंगले सापांचे द्वंद्वयुद्ध ! 

मोहन काळे
गुरुवार, 12 एप्रिल 2018

रोपळे बुद्रुक - मेंढापूर (ता. पंढरपूर) परिसरात भर रस्त्यावर दोन्ही धामण जातीच्या सापांनी सुमारे अर्धा तास आपली ताकद आजमावली. दोघांमध्ये चाललेले हे घनघोर युद्घ पाहण्यासाठी परिसरात गर्दी झाली होती. 

रोपळे बुद्रुक - मेंढापूर (ता. पंढरपूर) परिसरात भर रस्त्यावर दोन्ही धामण जातीच्या सापांनी सुमारे अर्धा तास आपली ताकद आजमावली. दोघांमध्ये चाललेले हे घनघोर युद्घ पाहण्यासाठी परिसरात गर्दी झाली होती. 

उन्हाळा सुरू झाला की सापांचा मिलनकाळ सुरू होत असतो. नर- मादी सापांच्या मिलनापूर्वी नर जातींच्या सापांमध्ये मादीला आकर्षित करण्यासाठी द्वंद्वयुद्ध होत असते. यात जो नर साप जिंकेल तो मादी सापाबरोबर मिलन करत असल्याचे सर्प अभ्यासकांचे मत आहे. सोलापूर येथील सर्प अभ्यासक पप्पू जामदार यांच्याशी याबाबत संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले, की सध्या सापांचा मिलनकाळ सुरू झाला. नर-मादीच्या मिलनादरम्यान दोन नर साप समोरासमोर आल्यास आपली ताकत दोन्ही नर अजमावत असतात. यालाच शास्त्रीय भाषेत "मेल कॉम्बॅट' असे म्हणतात. या वेळी जो नर साप ताकदवान असेल तो जिंकतो व मादीशी मिलन करून त्याची पुढील पिढी वाढवत असल्याचे त्यांनी सांगितले. 

अनेक वेळा या युद्धाला मिलन समजून लोक सापांच्या या नैसर्गिक प्रक्रियेत व्यत्यय आणतात. परंतु, पुढील पिढी जास्त सक्षम व सरस निर्माण करण्यासाठी उच्च प्रतीची जनुके अशाच स्पर्धांमधून पुढील पिढीला मिळत असल्याचे जामदार म्हणाले.

Web Title: snake fight in mendhapur