नाट्य परिषद निवडणूक अध्यक्षपदासाठी प्रसाद कांबळी विरुद्ध अमोल कोल्हे

रजनीश जोशी
मंगळवार, 27 मार्च 2018

सोलापूर - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदासाठी नवनाथ तथा प्रसाद मच्छिंद्र कांबळी विरुद्ध अमोल रामसिंग कोल्हे यांच्यात लढत होणार असल्याचे आज निश्‍चित झाले. सोलापुरातून निवडून गेलेल्या नियामक मंडळाच्या चार सदस्यांना कार्यकारिणीतील लढतीसाठी अंतिम पात्र उमेदवार यादीत स्थान मिळाले आहेत. सहा एप्रिलला मतदान व मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होईल.

पंढरपूरचे दिलीप कोरके यांना सहकार्यवाह पदासाठी उमेदवारी मिळाली आहे. या तीन पदांसाठी कोरकेंसह सुरेश गायधनी, सुनील ढगे, अशोक ढेरे, सतीश लोटके, दीपा क्षीरसागर अशा सहाजणांमध्ये लढत होईल. सोलापूरचे जयप्रकाश कुलकर्णी, आनंद खरबस आणि चेतन केदार या तिघांना कार्यकारिणी सदस्य पदासाठी उमेदवारी मिळाली आहे. कार्यकारिणी सदस्यपदाच्या जागा 11 असून, त्यासाठी 21 उमेदवारांमध्ये लढत होईल.

संमेलनाध्यक्षपदावर डोळा
प्रसाद कांबळी आणि मोहन जोशी यांच्या गटातच थेट निवडणूक होणार असल्याने ज्यांचे जास्त उमेदवार निवडून येतील, त्यांच्या हाती नाट्य परिषदेची सूत्रे राहतील. मोहन जोशी यांना नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद हवे असल्याने त्यांनी जाणूनबुजून निवडणूक लढवली नसल्याचे बोलले जाते. या पार्श्‍वभूमीवर कांबळी गटाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आल्यास मोहन जोशींना नाट्य परिषदेचे अध्यक्षपद, तर मिळणार नाहीच; पण संमेलनाध्यक्षपदही मिळणे दुरापास्त आहे. "तेलही गेले, तूपही गेले' अशी त्यांची स्थिती होईल.

Web Title: solapur maharashtra news natya parishad election prasad kambli amol kolhe