राज्याच्या शिक्षक समितीमध्ये उभी फूट? 

संतोष सिरसट
सोमवार, 8 जानेवारी 2018

सोलापूर - राज्यातील शिक्षकांच्या हक्कासाठी झटणाऱ्या शिक्षक संघटनांना घरघर लागू लागली आहे. 2007 मध्ये प्राथमिक शिक्षक संघामध्ये फूट पडली होती. त्यानंतर बरोबर दहा वर्षांनी राज्यातील दुसरी मोठी शिक्षक संघटना असलेल्या प्राथमिक शिक्षक समितीमध्येही सिंधुदुर्ग येथील अधिवेशनात फूट पडल्याची चर्चा आहे. या अधिवेशनानंतर उदय शिंदे व शिवाजी साखरे हे दोन समितीचे राजाध्यक्ष झाले आहेत. 

गेल्या 50-55 वर्षांपूर्वी पुण्याचे भा. वा. शिंपी व सोलापूरचे वि. भा. येवले यांनी स्थापन केलेल्या व आतापर्यंत एकसंध असलेल्या शिक्षक समितीमध्येही फूट पडली असल्याचे शिक्षकांमध्ये बोलले जात आहे. राज्यात शिक्षक समिती व शिक्षक संघ या दोन संघटना मजबूत आहेत. या दोन्ही संघटनांकडे शिक्षकांचा कलही मोठ्या प्रमाणात आहे; मात्र राज्यातील काही शिक्षक संघटना या "अर्थ'कारणाचा शिरोबिंदू ठरत आहेत. या अर्थकारणामुळेच शिक्षक संघटनांमध्ये फूट पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2007 मध्ये राज्याच्या शिक्षक संघामध्ये फूट पडून शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात हे दोन गट निर्माण झाले होते. त्यानंतर दहा वर्षांनी या दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याची मनोकामना बोलून दाखविली होती; मात्र अद्यापही त्याला मूर्तस्वरूप आलेले नाही. शिक्षक समिती या नावाच्या संघटनेमध्येही सिंधुदुर्ग अधिवेशनामध्ये फूट पडली आहे. विद्यमान सत्ताधारी असलेल्या गटाने साताऱ्यातील उदय शिंदे यांना राजाध्यक्ष, तर वर्धा येथील विजय कोंबे यांना सरचिटणीस म्हणून जाहीर केले आहे. ज्या वेळी विद्यमान सत्ताधाऱ्यांनी ही निवड केली त्याचवेळी लातूर येथील शिवाजी साखरे यांनी मला 22 जिल्हाध्यक्षांचा पाठिंबा असल्याचे सांगत स्वःताला शिक्षक समितीचे राजाध्यक्ष म्हणून घोषित केले. त्याचवेळी शिक्षक समितीमध्ये उभी फूट पडली. या फुटीमागे काहीतरी "अर्थ'कारण असल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर लोकशाहीला बाधक अशा गोष्टी अधिवेशनाच्या काळात घडल्यामुळे या संघटनेला फुटीचे ग्रहण लागल्याचेही बोलले जात आहे. 

अध्यक्ष निवडण्यापूर्वी झालेल्या नियामक बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार नव्या निवडी झाल्या आहेत. शिक्षक समिती एकसंध आहे. जे काही नाराज असतील त्यांची समजूत काढण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. 
उदय शिंदे, नूतन राजाध्यक्ष, शिक्षक समिती. 

Web Title: solapur news teacher