सोलापूरकरांना पावला गणराया! यंदा पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघणार विसर्जन मिरवणुका; लेझिम, दांडपट्टा, झांज, ढोल, टिपरी, मल्लखांब पाहण्याची सोलापूरकरांना संधी

सोलापुरातील नऊ मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांकडून उद्या (शनिवारी) विसर्जन मिरवणुका काढल्या जाणार आहेत. रात्री १२ वाजेपर्यंत मिरवणुकीस परवानगी आहे. या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गांवरील वाहतूक शनिवारी (ता. ५) सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार आहे. त्यामुळे मिरवणूक मार्गावरील वाहतूक रात्री १२ पर्यंत बंद ठेवली जाणार आहे.
गणेश विसर्जन मिरवणूक
गणेश विसर्जन मिरवणूकsakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या श्रद्धा आणि भक्तीच्या आनंदसोहळ्याची शनिवारी (ता. ६) सांगता होणार आहे. लाडक्या गणरायाला दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने निरोप देण्यासाठी सोलापूर शहरातील मंडळे सज्ज झाली आहेत. सोलापुरातील नऊ मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांकडून उद्या (शनिवारी) विसर्जन मिरवणुका काढल्या जाणार आहेत. रात्री १२ वाजेपर्यंत मिरवणुकीस परवानगी आहे. या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गांवरील वाहतूक शनिवारी (ता. ५) सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार आहे. त्यामुळे मिरवणूक मार्गावरील वाहतूक रात्री १२ पर्यंत बंद ठेवली जाणार आहे.

गणेश चतुर्थीच्या मंगल मुहूर्तावर सुरू झालेल्या गणेशोत्सवाने शहर व जिल्ह्यात सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. या १० दिवसांत विविध गणपतींचे दर्शन घेण्याची ओढ आणि देखावे पाहण्याचा उत्साह भाविकांना होता. आता या उत्सवाचा शेवट भव्य-दिव्य विसर्जन मिरवणुकांनी होणार आहे. गणरायाला निरोप देताना डोळे पाणावणार असले तरी विसर्जन मिरवणुकीत कोणतीही कसर राहू नये, यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. मिरवणुकीसाठी भव्य रथ, आकर्षक पालख्या सज्ज झाल्या आहेत. घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन व मध्यवर्ती महामंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुकांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ शकते. त्यामुळे मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी निर्माण होईल आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गांवरून अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय अन्य कोणत्याही वाहनास परवानगी नसणार आहे, असे शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या मार्गावरील वाहनांसाठी दरवर्षीप्रमाणे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री १२ नंतर पूर्वीप्रमाणे वाहतूक सुरू राहील, असेही आदेशात नमूद आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी सोलापूर शहरात अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. विसर्जनस्थळी देखील पोलिसांचा बंदोबस्त नेमला आहे.

यंदाची मिरवणूक निघणार ‘डीजेमुक्त’

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी डीजेमुक्त मिरवणुकासंदर्भात आदेश काढले आहेत. मिरवणुकांमध्ये लेझर लाइट शोचा वापर करण्यावरही निर्बंध घातले आहेत. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असून तशा सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील नऊ मध्यवर्तींसह गावागावातील सर्व मंडळांच्या मिरवणुका यंदा डीजेमुक्त निघतील. त्यामुळे मिरवणुका पाहायला येणाऱ्या गणेशभक्तांची संख्या यंदा मोठी असणार आहे.

लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ

  • मिरवणुकीस सुरवात : बालाजी मंदिर येथून सकाळी ८ वाजता मिरवणुकीस सुरवात होईल. पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या हस्ते विसर्जन पूजा होणार आहे.

  • मिरवणुकीत सहभागी मंडळे : १२०

  • मिरवणुकीचे आकर्षण : लेझीम, मल्लखांब, झांज, टिपरी, दांडपट्टा आदी.

  • मिरवणूक मार्ग : नळ बाजार चौकातून निघालेली मिरवणूक पेंढारी मशीद- मुर्गी नाला- सतनाम चौक- कुंभार गल्ली- मौलाली चौक- जगदंबा चौक- हुमा मेडिकल- सात रस्ता- शासकीय दूध डेअरी- जिल्हाधिकारी कार्यालय. मुर्ती विसर्जन महापालिकेच्या माध्यमातून धर्मवीर संभाजी तलावात.

  • ------------------------------------------------------

पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघेल मिरवणूक

दरवर्षीप्रमाणे यंदाही लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक पारंपारिक वाद्याच्या गजरात निघेल. पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या हस्ते विसर्जन पूजा होईल, त्यानंतर बालाजी मंदिर येथून सकाळी आठ वाजता मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे.

- देवेंद्र भंडारे, संस्थापक, लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ

----------------------------------------------------------------------------------

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ

  • मध्यवर्ती अंतर्गत मंडळांची संख्या : १३०

  • मिरवणूक काढणाऱ्या मंडळांची संख्या : ६०

  • मिरवणुकीचे वैशिष्ट्ये : या मिरवणुकीत लेझीम, ढोल, ताशा, हलगी, देखावे, पथनाट्य आदींचे सादरीकरण होणार आहे. पारंपारिक वाद्यांमध्ये व सामाजिक संदेश देणारी मिरवणूक असणार आहे.

  • मिरवणुकीची पूजा : रुक्माई मानाचा गणपतीची पूजा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या हस्ते करून मिरवणुकीला सायंकाळी ४.३० वाजता सुरवात करण्यात येणार आहे. रात्री बारापूर्वी विसर्जन केले जाणार आहे.

  • मिरवणूक मार्ग : सैफूल चौकातून पुढे इंचगिरी मठ- संत रोहिदास चौक- आयटीआय पोलिस चौकी- जुना विजापूर नाका- धर्मवीर संभाजी तलाव.

--------------------------------------------------------------------

डीजेचा वापर करणार नाही

विजापूर रोड मध्यवर्ती मंडळांतर्गत शिस्तबध्द व शांततेत मिरवणुका निघतात. १५ ते २० टक्के मंडळं डीजेचा वापर करत होती. यंदा डीजेमुक्तीसाठी मध्यवर्तीने पुढाकार घेत अनेक मंडळांना प्रत्यक्ष भेट देऊन मंडळाच्या प्रमुखांना डीजेमुक्तीमध्ये सहभागी करून घेतले आहे. सकाळची भूमिका हीच मध्यवर्तीची भूमिका आहे. त्यामुळे डीजेमुक्ती मोहिमेसाठी आमचा कायम पाठिंबा असणार आहे.

- रविवार भोपळे, अध्यक्ष, विजापूर रोड मध्यवर्ती महामंडळ

---------------------------------------------------------------------------

सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळ

  • मिरवणूक शुभारंभ : आमदार विजयकुमार देशमुख, पोलिस आयुक्त एम. राजुकमार

  • मिरवणुकीची वेळ : सकाळी ११ वाजता

  • सहभागी मंडळ : ४०

---------------------------------------------------------------

पारंपारिक वाद्याच्या गजरात निघणर मिरवणूक

मंडळाची स्थापना १९५६ मध्ये झाली आहे. मंडळाने पारंपरिक वाद्यांना नेहमी प्राधान्य दिले आहे. डीजे आल्यापासून मंडळाने त्याला विरोध दर्शवला आहे. शांतता समितीच्या बैठकीतही मंडळाने ते स्पष्ट केले आहे. यंदा डीजेवर बंदी घालण्याचा प्रशासनाचा निर्णय स्वागतार्ह, शहर व नागरिकांच्या हिताचा आहे. आमच्या मंडळांकडून पारंपारिक वाद्ये व लेझीम, झांज, ढोल, टिपऱ्या संघांसह मिरवणूक निघणार आहे.

- सोमनाथ मेंडके, अध्यक्ष, सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळ

-------------------------------------------------------------------------

पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव

  • मिरवणूक सुरवात : सकाळी ११ वाजता, मद्दा मगंल कार्यालय, कन्ना चौक येथे पालखी व श्रीगणेशपूजनाने मिरवणुकीस प्रारंभ.

  • मिरवणूक उद्‌घाटन : आमदार विजयकुमार देशमुख, प्रथमेश कोठे, पांडुरंग दिड्डी यांच्यासह मंडळाचे ट्रस्टी व पदाधिकारी उपस्थित राहणार

  • मिरवणूक मार्ग : कन्ना चौक- राजेंद्र चौक- जोड बसवण्णा चौक- भद्रावती पेठ- मार्कंडेय चौक- दत्तनगर- पद्मशाली चौक- जेलरोड बोळ- पेंटर चौक- सिद्धेश्वर हायस्कूल- विष्णू घाट येथे रात्री १२ वाजता विसर्जन

  • मिरवणुकीची वैशिष्ट्ये : या मिरवणुकीत पूर्व भागातील सुमारे २२ मंडळे सहभागी होणार आहेत. सर्व मंडळे पारंपरिक वाद्याच्या गजरातच मिरवणूक काढणार आहेत. या मिरवणुकीत वारकरी भजनी मंडळाचा सहभाग असून मिरवणुकीदरम्यान रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक मंडळांची मिरवणूक महिला भजन पथकासह निघणार आहे.

  • -------------------------------------------------------------------------

डीजेला फाटा देऊन पारंपारिक वाद्याला प्राधान्य

आम्ही मागील पाच वर्षांपासून डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत आलो आहोत. यंदा आम्ही जे मंडळ डीजे लावण्याचा निर्णय घेईल, त्यास मध्यवर्ती मंडळाची परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे.

- अजय दासरी, ट्रस्टी सचिव, पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ

---------------------------------------------------------------

विडी घरकूल मध्यवर्ती मंडळ

  • एकूण मंडळे : ६०

  • मिरवणुकीत सहभागी : १५

  • मिरवणूक सुरवात : माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या हस्ते, स्थळ : पंचमुखी देवस्थान, विडी घरकुल

  • मिरवणुकीतील आकर्षण : शुपर्कण गणपती, वरद गणपती, फेटा गणपती, लक्ष्मीराज गणपती, भाग्यनगर गणेशोत्सव मंडळ यांचे मिरवणुकीत लेझीम व ढोल-ताशा पथक हे आकर्षण असणार आहे.

  • मिरवणूक मार्ग : पंचमुखी देवस्थान- वैष्णवी मारुती मंदिर चौक- संभाजी शिंदे हायस्कूल समोरून पुढे पोषम्मा चौक- महालक्ष्मी चौक- सागर चौक- विजय मारुती चौक- नवनीत चौकातून वळसा घेऊन गणेश मंदिर- बी ग्रुप- श्रीनेत्र चौकातून म्हाडा विहीर.

  • -----------------------------------------------------------------------

लोकमान्य मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ

  • मिरवणूक मार्ग : पत्रा तालीम, सळई मारुती, मल्लिकार्जुन मंदिर, तरटी नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेकॅनिक चौक, सरस्वती चौक, लकी चौक मार्गे गणपती घाट

  • मिरवणूक सुरवात : दुपारी १ वाजता

  • मिरवणुकीचे आकर्षण : सर्व मिरवणुकांमध्ये केवळ पारंपारिक वाद्ये व लेझीमचे मर्दानी डाव

  • मिरवणुकीचे उद्‌घाटन : पोलिस आयुक्त एम. राज कुमार

  • मिरवणुकीत सहभागी मंडळे : ५०

  • -----------------------------------------------------------------

डीजेमुक्त अभियानाला पाठिंबा

डीजेमुक्त अभियानाला आमचा पाठिंबा आहेच लोकमान्य मध्यवर्ती अंतर्गत येणाऱ्या सर्व मंडळात डीजे नाही आम्ही पूर्वीपासूनच डीजेमुक्त मिरवणूक काढतो यंदाच्या वर्षीही अशी डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा होईल.

- दत्ता भोसले, अध्यक्ष, लोकमान्य मध्यवर्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com