गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणून सोलापूरच्या भोंदूबाबाने ‘इतक्या’ लोकांना १५ कोटींना गंडविले; एकजण वकील म्हणून कायदेशीर बाजू सांभाळायचा तर...

गुप्तधनाचा हंडा शोधून देतो असे आमिष दाखवून सोलापुरातील भोंदूबाबाने दीड वर्षात सात- आठ जणांना १५ कोटींना गंडा घातल्याचे पोलिसांनी सांगितले. मोहम्मद कादर शेख असे संशयिताचे नाव असून त्याच्याविरुद्ध आता एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
Solapur Crime
Solapur Crimeesakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : गुप्तधनाचा हंडा शोधून देतो असे आमिष दाखवून सोलापुरातील भोंदूबाबाने दीड वर्षात सात- आठ जणांना १५ कोटींना गंडा घातल्याचे पोलिसांनी सांगितले. मोहम्मद कादर शेख असे संशयिताचे नाव असून त्याच्याविरुद्ध आता एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय कर्नाटकातील चित्तापूर व विजयपूर आणि तुळजापूर तालुक्यातील काटी सावरगाव येथूनही फसवणुकीच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत.

अक्कलकोट रोडवरील कोंडा नगरातील राजू विनायक आडम यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ५ सप्टेंबर २०२३ ते मार्च २०२४ या काळात गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणून भोंदूबाबा मोहम्मद शेख याने फसविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. प्रत्येकवेळी तो घरी आल्यावर काहीतरी द्रव्य प्यायला द्यायचा. त्यातून तरतरी येऊन शारीरिक ऊर्जा वाढल्यासारखे वाटायचे. त्या मांत्रिकाने घरातील गुप्तधनाचा हंडा शोधून देतो म्हणून सात महिन्यांत तब्बल एक कोटी २६ लाख ३४ हजार ६०० रुपयाला फसविल्याचेही आडम यांनी पोलिसांना सांगितले.

तत्पूर्वी, सोलापूर शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने मोहम्मद शेख या भोंदूबाबाला पकडले होते. सध्या त्याच्यासह सात जण न्यायालयीन कोठडीत आहेत. एमआयडीसी पोलिसांत नवा गुन्हा दाखल झाल्याने आता त्यांना पोलिस ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करणार आहेत.

भोंदूबाबाच्या वकिलालाही अटक

गुप्तधनाचा हंडा शोधून देतो अशा आमिषातून अडचणीतील कुटुंबांना, ज्या कुटुंबाकडून जास्तीत जास्त पैसा काढता येईल अशांना तो भोंदूबाबा फसवायचा. त्यात मोहम्मदला तशी कुटुंब शोधून देण्यासाठी सहा-सात जण मदत करत होते. इम्रान, तमीम कुरेशी, आयुब रचभरे, सचिन गायकवाड, दाऊद पठाण व लक्ष्मण वाघमारे अशी त्या संशयितांची नावे आहेत. गुन्हा दाखल झाल्यावर प्रत्येकवेळी भोंदूबाबाला कायदेशीर मदत करणारा व भोंदूबाबाकडील ऐवज वाटून घेणाऱ्या वकिलही या गुन्ह्यात आहे. सचिन गायकवाड असे त्याचे नाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com