मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; राज्यात उभारले जाणार सौरऊर्जा पार्क | Solar Park | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

udhav thakare

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; राज्यात उभारले जाणार सौरऊर्जा पार्क

मुंबई : मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत राज्याच्या दृष्टीने मोठी घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क (Solar Energy Park) उभारण्यासाठीचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासाठी महानिर्मिती कंपनीस एनटीपीसी लि. सोबत संयुक्त कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही संयुक्त कंपनी राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क विकसित करणार आहे. (Solar Park In Maharashtra)

हेही वाचा: शिवराळ भाषेवरुन रोहित पवारांचा संजय राऊतांना सल्ला; म्हणाले...

राज्यात सध्या 9305 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित असून 2123 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. या समितीवर राज्य शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा धोरणाशी सुसंगत अशा बाबींचे पालन करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. सौर ऊर्जा पार्कमधील प्रकल्पधारकाकडून एक रकमी शुल्क व वार्षिक संचलन व देखभाल शुल्क आदी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आले आहे. (Maharashtra Cabinet Meeting)

हेही वाचा: शशी थरूर यांनी संसदेत काय केले पाहा…. नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंतचे अल्ट्रामेगा सौर ऊर्जा पार्क विकसित करण्याकरता नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) आणि महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी 50:50 टक्के प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. अपारंपरिक ऊर्जासाठी 17360 मेगावॅट क्षमतेच्या निर्मितीचे प्रकल्प 21 मार्च 2025 पर्यंत विकसित करण्यात येणार आहे. यापैकी 12930 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करण्याचे उद्दिष्ट आहे.

Web Title: Solar Energy Park To Be Set In Maharashtra Decision By Uddhav Thackeray Cabinet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..