esakal | दिवाळीपर्यंत मिळणार एफआरपीचे 2400 कोटी ! राज्यातील काही शेतकऱ्यांचे कारखान्यांशी करार
sakal

बोलून बातमी शोधा

FRP

दिवाळीपर्यंत मिळणार एफआरपीचे 2400 कोटी !

sakal_logo
By
प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांनी 2020-21 मधील उसाची एफआरपीची रक्कम मिळण्याबाबत साखर कारखान्यांशी करार केले आहेत.

माळीनगर (सोलापूर) : राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांनी 2020-21 मधील उसाची एफआरपीची रक्कम (Sugarcane FRP) मिळण्याबाबत साखर कारखान्यांशी करार केले आहेत. करारानुसारचे दोन हजार 419 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत मिळणार आहेत. त्यामुळे सध्या एफआरपीची 799 कोटी रुपये थकबाकी आहे. साखर आयुक्तालयाने (Sugar Commissionerate) 30 जूनपर्यंतचा थकीत एफआरपीचा अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार साखर कारखान्यांनी एक हजार 14 लाख टन उसाचे गाळप यंदाच्या हंगामात केले आहे. त्याची ऊसतोडणी वाहतूक खर्चासह एफआरपीची एकूण देय असलेली रक्कम 32 हजार 143.75 कोटी रुपये इतकी आहे. करारानुसार देय असलेली रक्कम 30 हजार 524 कोटी रुपये आहे. त्यातील शेतकऱ्यांना 29 हजार 725 कोटी रुपये आतापर्यंत देण्यात आले आहेत. (Some farmers in the state will get FRP before Diwali by signing agreements with factories)

हेही वाचा: श्‍वानांचे लसीकरण आवश्‍यकच! जाणून घ्या "रेबीज'ची लक्षणे व घ्यावयाची दक्षता

काही कारखान्यांनी एफआरपीशिवाय 35.95 कोटी रुपये अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. पुणे (Pune), नगर (Nagar), सोलापूर (Solapur) जिल्ह्यासह मराठवाड्यातील (Marathwada) शेतकऱ्यांनी एफआरपीची रक्कम टप्प्यात घेण्यासाठी साखर कारखान्यांबरोबर करार केले आहेत. त्यामुळे त्यानुसार दोन हजार 419 कोटी रुपये ही रक्कम थकीत आहे, असे म्हणता येणार नाही. या करारानुसार ती रक्कम दिवाळीपर्यंत किंवा नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी घेण्याचे शेतकऱ्यांनी एकप्रकारे मान्य केले आहे. 133 कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिली आहे. शेतकऱ्यांना आतापर्यंत 97.38 टक्के एफआरपी मिळाली असून 2.62 टक्के एफआरपी थकीत आहे.

हेही वाचा: वेड्या बहिणीची वेडी माया ! बहिणीने भावाला किडनीदान करून दिले जीवदान

शेतकऱ्यांनी एफआरपी घेण्यासाठी साखर कारखान्यांबरोबर करार केले आहेत. करार करणे कायदेशीर आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना एफआरपी मिळणार आहे.

- शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे

ठळक मुद्दे

  • 29 हजार 725 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा

  • राज्यात 799 कोटी रुपये एफआरपी थकीत

  • 133 कारखान्यांनी दिली शंभर टक्के एफआरपी

  • 32 कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत कारवाई

loading image