नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये सोलापूरच्या सुपुत्राची नियुक्ती 

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 3 July 2020

आयुर्वेदातील प्रदीर्घ अनुभव 
डॉ. तात्यासाहेब देशमुख हे गेल्या 23 वर्षापासून सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात आपली सेवा देत आहेत. सोलापुरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. याशिवाय उत्तरकाशी उत्तराखंड येथील आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत. 

सोलापूर : जयपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये सोलापूरचे डॉ. तात्यासाहेब देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्यावतीने ही नियुक्ती करण्यात आली आहेत. 
एनआयए ही संस्था आयुर्वेदाचे शिक्षण, संशोधन, प्रचार-प्रसार व आयुर्वेदीय औषधींचे मूल्यांकन करणारी देशाची अग्रगण्य संस्था आहे. आयुष मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही संस्था काम करते. सोलापूरच्या डॉ. तात्यासाहेब देशमुख यांच्या रूपाने महाराष्ट्रालाया संस्थेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी प्रथमच मिळत आहे. डॉ. देशमुख हे अंकोली (ता. मोहोळ) या ग्रामीण भागातून पुढे आले आहेत. त्यांनी आयुर्वेदामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल वैद्यकीय तसेच इतर सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Son of Solapur appointed to Governing Council of National Institute of Ayurveda