esakal | कोरोना महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल - मनसे
sakal

बोलून बातमी शोधा

Raj and Uddhav thackeray

कोरोना महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल - मनसे

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची (corona patient) संख्या वाढत चालली आहे. पुन्हा एकदा निर्बंध (restriction) घालण्याची सरकार दरबारी चर्चा सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandeep deshpande) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. कोरोना हा रोग नाहीय तर सरकारी रोग आहे अशी तिखट प्रतिक्रिया मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

"महाराष्ट्रात करोनाच एवढं स्तोम माजवल जातंय की, यापुढे करोना हा चायनीज व्हायरस ऐवजी महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल. सरकारने कोरोना संबधित सर्व डेटा जनतेबरोबर पारदर्शक पणे शेअर केला पाहिजे" असं संदीप देशपांडे यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा: पंजशीर खोऱ्यात तालिबानच्या चौक्यांवर AIR STRIKE

गणेशोत्सवाच्या काळात गर्दी वाढू शकते. आताही खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होतेय. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती सरकारला वाटतेय. सरकारकडून पुन्हा एकदा निर्बंध लावले जातील अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे.

हेही वाचा: Good News: गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांसाठी RTPCR चे बंधन नाही

सोमवारी मुंबईत ३७९ कोरोना रुग्णांची नोंद

काल कोरोनाच्या नवीन रुग्णांचा (Corona new patients) आकडा काहीसा कमी झाला असून सोमवारी 379 नवीन रुग्णांची नोंद झाली. रविवारी 496 रुग्ण आढळले होते. तर सोमवारी दिवसभरात मृतांचा (corona deaths) आकडा वाढला असून 2 वरून 5 वर गेला आहे. मृतांचा एकूण आकडा 15,998 वर पोहोचला आहे.

दरम्यान सोमवारी 31,577 चाचण्या झाल्या असून पॉझिटिव्हीटी दर 1.15 टक्के इतका आहे. आतापर्यंत 94,65,536 एवढ्या झाल्या आहेत. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 1290 दिवस असा आहे.

loading image
go to top