Wadettiwar Alleges Massive Corruption in Soybean Procurement
sakal
महाराष्ट्र विधानसभा : खरेदी केंद्रांवर स्वीकारलेले सोयाबीन गोडाउनमध्ये नाकारले जात आहे. ज्या सोयाबीनचा ओलावा ९ टक्के आहे तोही नाकारला जात आहे. ही शेतकऱ्याची लूट आहे. तसेच खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी बीड येथील एका व्यक्तीमार्फत पणनमंत्री जयकुमार रावल यांचे ओएसडी चार लाख रुपये घेत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.