जान्हवी फाउंडेशन: मुलींच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणारी स्वयंसेवी संस्था

Janvhi Foundation
Janvhi FoundationSakal

"सकाळ सोशल फाउंडेशन" च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी "सोशल फॉर अॅक्शन" हा ऑनलाईन वेबसाईट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरु करण्यात आला आहे. या वेबसाईटला उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्थां व देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी "सोशल फॉर अॅक्शन" क्राउड फंडींगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाईल. आजच्या भागात पुणे शहर व जिल्हा स्तरावर दुर्गम आदिवासी भागात किशोरवयीन मुलींसाठी आरोग्यविषयक व शैक्षणिक उपक्रम राबवून तसेच युवकांमधील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी उपक्रमांचे आयोजन करून , युवकांचे राहणीमान व आयुष्मान उंचाविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या " जान्हवी फाउंडेशन " या स्वयंसेवी संस्थेची माहिती घेणार आहोत.

जान्हवी फाउंडेशन ही एक स्वयंसेवी संस्था असून , सन २००९ पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. सन २००९ मध्ये कै. बाबासाहेब गायकवाड यांच्या पुढाकाराने संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र तुळसे , डॉ विक्रम गायकवाड व इतर समविचारी सेवाभावी लोकांच्या मदतीने आरोग्य, शिक्षण , पर्यावरण या क्षेत्रात लोकसहभागातून तळागाळातील लोकांचे आयुष्यमान उंचविण्यासाठी जान्हवी फाउंडेशन संथेची स्थापना करण्यात आली. संस्थे मार्फत शहर परिसरातील झोपड्पट्टी भागात तसेच ग्रामीण भागात शिरेद्वारे नशा करणाऱ्या युवकांसाठी तसेच दारू , तंबाखू ,गांजा इत्यादींचे व्यसन करणाऱ्या तरुण व युवकांसाठी समुपदेशन , जनजागृतीपर मार्गदर्शन व उपचार आदी उपक्रम राबविले जातात. तसेच झोपड्पट्टी भागातील किशोरवयीन मुलींसाठी वेळोवेळी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरे आयोजित केले जातात.

जान्हवी फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून २०१४ पासून बेघर लोकांसाठी पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने दिवस रात्र निवारा प्रकल्प चालविला जातो. या प्रकल्पात बेघर लोकांसाठी मोफत राहण्याची व्यवस्था केली जाते. तसेच अशा लोकांचे समुपदेशन करून , त्यांच्या समस्या मूलतः सोडवण्यासाठी एक कृती आराखडा तयार केला जातो. कृती आराखड्यानुसार त्यांच्या समस्यांवर काम करून , त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केला जातो. संस्थेकडून ज्या बेघर लोकांकडे आधार कार्ड , रेशनिंग कार्ड नाहीत अशा सर्वांना आधारकार्ड व रेशनिंग कार्ड देण्याची व्यवस्था केली जाते. कोरोनाच्या साथीत व लॉकडाऊन काळात हा निवारा प्रकल्प लोकांसाठी आधारवड ठरला. लॉकडाऊन कालावधीत पायी चालत निघालेल्या कामगारांना निवारा प्रकल्पात आश्रय मिळाला व त्यांना परत रोजगार मिळवून देण्याचे काम जान्हवी फाउंडेशन मार्फत करण्यात आले.

२०१८ पासून जान्हवी फाउंडेशन संस्थेने महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्थेच्या सहकार्याने शिरेद्वारे नशा करणाऱ्या युवकांसाठी समुपदेशन प्रकल्प पिंपरी येथे कार्यान्वीत केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत गर्द सह इतर व्यसने करणाऱ्या युवकांसाठी मोफत दवाखाना चालवला जातो. यामध्ये OST (ओपाईड सबसटीट्युट थेरपी) दिली जाते. जान्हवी फाउंडेशनचे हे केंद्र मुबई वगळता महाराष्ट्रात असणारे दुसरे एकमेव सुविधा केंद्र आहे. या प्रकल्पाव्दारे तंबाखू, दारू, गांजा , गर्द इत्यादींचे व्यसन सुटण्यासाठी उपचार व समुपदेशन केले जाते.

जान्हवी फाउंडेशन मार्फत वस्तीपातळीवर पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने तसेच ग्रामीण भागात जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने महिला सक्षमीकरणाचे उपक्रम राबविले जातात, यामध्ये महिलांना स्वयंरोजगारांसाठी प्रशिक्षण , व्यवसाय सहकार्य आदीचे काम केले जाते. तसेच वस्तीपातळीवर व ग्रामीण भागात शालेय व किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी , आरोग्य , स्वच्छता यांविषयी समुपदेशन व मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन केले जाते. तसेच किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी, सॅनिटरी पॅड वाटप, हिमोग्लोबीन तपासणी , उपचार व औषधे वाटप असे उपक्रम राबविले जातात.

याशिवाय संस्थेकडून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सहकार्याने किशोरवयीन मुलीचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानमालांचे आयोजन तसेच महिलांसाठी डिजिटल साक्षरता अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. जान्हवी फाउंडेशन मार्फत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात ग्रामीण व आदिवाशी भागातील ७५० किशोरवयीन मुलींसाठी वयात येताना होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळीच्या वेळी घ्यावयाची काळजी व व्यक्तिगत शारीरिक स्वच्छता, सॅनिटरी पॅडचा वापर व योग्य विल्हेवाट , मासिक पाळीविषयी गैरसमज व अंधश्रद्धा , वास्तविकता , गुड- टच बड- टच , करिअर समुपदेशन यांविषयी मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच सॅनिटरी पॅडचे वाटप करून , दर तीन महिन्यांनी रक्तक्षयाची तपासणी व लोहच्या गोळ्यांचे वाटप व त्यानंतर पुन्हा मुलींची तपासणी करुन , झालेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.

वरील उपक्रमांतर्गत एका मुलींसाठी किमान ( आरोग्य तपासणी , औषधे व सॅनिटरी पॅड ) एक हजार खर्च येणार आहे. भोर परिसरातील व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त किशोरवयीन मुलींना वरील प्रकल्पात सहभागी करून घेण्यासाठी संस्थेला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. आणि हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी संस्थेला आपल्या सर्वांच्या सामूहिक मदतीची गरज आहे.

"जान्हवी फाउंडेशन" या स्वयंसेवी संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळे संस्था चालते. सकाळ माध्यम समूहाच्या "सोशल फॉर अॅक्शन" या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर "जान्हवी फाउंडेशन" या संस्थेच्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती -तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन "जान्हवी फाउंडेशन" या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com