चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करता येणार का? महापौर पेडणेकर म्हणाल्या....

Kishori-Pednekar
Kishori-Pednekare sakal

मुंबई : येत्या सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन आहे. त्यामुळे चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी मुंबईत येतात. पण, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजन करण्यात येणार आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी सांगितले.

Kishori-Pednekar
Omicron : दक्षिण आफ्रिकेत एकाच दिवासात कोरोनाची रुग्णसंख्या दुप्पट

गेल्या वर्षी देखील कोरोनाचं संकट होतं. त्यामुळे मोजक्या लोकांना चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्याची संधी दिली होती. यंदा सर्वांना बाबासाहेबांना अभिवादन करता येणार आहे. त्यासाठी चैत्यभूमीच्या बाहेर रांगा लागतील. लाखो अनुयायी मुंबईमध्ये येतील. त्यांचं उन, पावासापासून संरक्षण करण्यासाठी निवारे तयार करण्यात आले आहेत. तसेच त्यांना खायला सुद्धा देण्यात येणार आहे. मात्र, ओमिक्रॉनचा धोका पाहता सर्वांना काळजी घेणे गरजेचे आहे. मुंबईत असणाऱ्या लोकांनी बाबासाहेबांना ऑनलाइन अभिवादन करावं. कारण, त्यांना कधीही चैत्यभूमीवर जाऊन दर्शन घेता येतं. बाहेरून आलेल्या लोकांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महापौर, उपमहापौरांनी अभिवादन केल्यानंतर सर्वांना अभिवादन करण्याची संधी दिली जाईल, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

सध्या जगावर कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचं संकट घोंगावतेय. आतापर्यंत जवळपास २५ देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले काही प्रवासी देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पण, त्यांना नव्या व्हेरियंटची लागण झाली का हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळेच चैत्यभूमीवर येताना सर्वांनी काळजी घ्यावी आणि सूचनांचे पालन करावे, असे महापौर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com