अकरावी प्रवेश प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष भरारी पथक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्य शासनाच्या नियमांप्रमाणे पार पडावी आणि राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

मुंबई : दहावीच्या परिक्षांचा निकाल लागला की, विद्यार्थ्यींची लगबग चालू होते ती, अकरावीला प्रवेश घेण्याची परंतु, सध्या महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना डोनेशन मागण्यात येत आहे. तसेच, कधी कधी प्रवेश प्रकिया राज्य शासनाच्या नियमांप्रमाणे होत नाही, या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्य शासनाच्या नियमांप्रमाणे पार पडावी आणि राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष भरारी पथक यावर्षी स्थापन करण्यात आले असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून सांगण्यात आले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special Squash Squad to monitor 11th Admission process