esakal | दहावी बारावीच्या परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीत काय ठरलं वाचा

बोलून बातमी शोधा

दहावी बारावीच्या परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीत काय ठरलं वाचा}

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर या सल्लागार समितीची पहिली बैठक पार पडली असल्याची माहिती दिली.

दहावी बारावीच्या परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीत काय ठरलं वाचा
sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या संदर्भात विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या सल्लागार समितीची पहिली बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा या ऑफलाईन घेतल्या जातील यावर भर देण्यात आला असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक मागील आठवड्या पूर्वी अंतिम करत ते जाहीर करण्यात आले आहे. मात्र त्याच पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाने डोके वर काढले असल्याने या परीक्षा कशा घ्यायच्या, यासंदर्भात राज्यभरात विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने या परीक्षेच्या संदर्भातील उपाय योजना करण्यासाठी एक सल्लागार समिती नेमली असून त्या समितीची पहिली बैठक आज पुण्यामध्ये पार पडली. या बैठकीत राज्यभरातील शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांचा आढावा घेत दहावी आणि बारावीचे परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने घ्यावी यावर भर देण्यात आला. या परीक्षा घेताना विविध प्रकारच्या उपाययोजना तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षा यावर कशा प्रकारे भर देता येईल यावरही चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आले.

महत्त्वाची बातमी :  मनसुख हिरेन मृत्यूनंतर सचिन वाझे यांची पहिली प्रतिक्रिया 

दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर या सल्लागार समितीची पहिली बैठक पार पडली असल्याची माहिती दिली.

वर्षा गायकवाड यांनी" कोविड19च्या पार्श्वभूमीवर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षांचे आयोजन करताना आवश्यक उपाययोजना निश्चितीसाठी सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीची प्रथम बैठक आज राज्यमंडळ, पुणे येथे घेण्यात आली". अशी माहिती दिली.

दहावी-बारावीच्या परीक्षा संदर्भात उपाययोजना करण्यासाठी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यात शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष,  वसंत काळपांडे, मंडळाचे माजी अध्यक्ष विनय दक्षिणदास, यांच्यासह शिक्षण मंडळातील इतर अधिकारी, पुण्यातील ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक,विजय जाधव, कात्रज येथील शाळेचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र गायकवाड,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे प्राचार्य, विकास गरड, पुणे मंडळाचे सदस्य नितीन म्हेत्रे आदींचा समावेश आहे.

महत्त्वाची बातमी : अर्णब गोस्वामी यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, दिला महत्त्वपूर्ण निर्णय

SSC and HSC exams important decision taken in the preliminary meeting of education department