व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ | Admission | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

admission
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ

पुणे - मुदत उलटून गेल्यामुळे आपल्याला जर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज दाखल करता आला नाही. तर निराश होण्याचे कारण नाही. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण आणि औषधनिर्माणशास्त्रासह विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे.

राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया दिवाळीच्या नुकतेच आधी सुरू झाली होती. त्यामुळे दिवाळीच्या सुटीत महाविद्यालये बंद असल्याने सर्वच विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (कॅप) समुपदेशन मिळाले नाही. तसेच अर्जही दाखल करता आला नाही. बंद असलेल्या एसटीचा फटकाही विद्यार्थ्यांना या काळात बसला होता. यासंबंधी असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अन ऐडेड इन्स्टिट्यूट इन रूरल एरिया या संस्थेच्या वतीनेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना पत्र देण्यात आले होते. विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेता सीईटी सेलच्या वतीने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

हेही वाचा: बॅंक ऑफ बडोदामध्ये B.Tech अन्‌ M.Tech पास तरुणांना नोकरीची संधी!

अर्ज दाखल करण्याच्या नवीन तारखा..

अभ्यासक्रम - मुदतवाढ

- बी.फार्मसी आणि डी.फार्मसी - २३ नोव्हेंबर

- अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण (बीई, बीटेक) - २१ नोव्हेंबर

- एम.आर्च - १९ नोव्हेंबर

- एम.सी.ए. - २२ नोव्हेंबर

- एम.फार्मसी, एम.ई.,एम.टेक - १९ नोव्हेंबर

- बी.आर्च, डी.एस.ई - २० नोव्हेंबर

- एम.बी.ए., एम.एम.एस. - २२ नोव्हेंबर

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ - https://cetcell.mahacet.org/

प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ मिळाल्यामुळे ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येणार आहे. आता महाविद्यालये सुरू झाली असून विद्यार्थ्यांना योग्य ते समुपदेशन मिळेल. तसेच अमरावतीतील स्थिती पूर्वपदावर आल्याने तेथील विद्यार्थ्यांनाही अर्ज दाखल करता येईल.

- रामदास झोळ, अध्यक्ष, अनएडेड इन्स्टिट्यूट असोसिएशन

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नोंदणी प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला होता. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करता पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

- रविंद्र जगताप, आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष

loading image
go to top