

महाराष्ट्रा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारीला तर दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीला सुरू होणार आहेत. बोर्डाकडून या परीक्षेचे पेपर होण्याआधीच निकाल कधीपर्यंत लागेल याची माहिती दिली. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दहावी-बारावी परीक्षेचा निकाल १५ मे पर्यंत लागणार असल्याचं म्हटलंय. दरम्यान, आता दहावी बारावीच्या हॉलतिकिटात मोठे बदल केल्याचं समोर आलंय. बारावीचे हॉल तिकीट देण्यास सोमवारपासून सुरुवात करण्यात आलीय. या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करण्यात आला आहे.