
SSC-HSC Result Marathi News: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी-बारावीची परीक्षा यंदा दरवर्षीच्या तुलनेत १० ते १५ दिवस अगोदर सुरू होत आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. राज्यात कॉपीमुक्त परीक्षा होण्यावर शिक्षण विभागाने लक्ष केंद्रीत केले असून त्या अनुषंगाने विविध पावले उचलली जात आहेत. त्याचबरोबर आता दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकालही १५ मेपर्यंत लागणार असल्याचा सुतोवाच खुद्द शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केला.