'हिंदुस्थानी भाऊ'ला अटक होणार? विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आरोप | Hindustani Bhau News Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Will Hindustani Bhau Be Arrested?

'हिंदुस्थानी भाऊ'ला अटक होणार? विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आरोप

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे विकास पाठक उर्फ 'हिंदुस्थानी भाऊ' चे नाव अनेक आंदोलक विद्यार्थांकडून घेण्यात आले आहे.(Hindustani Bhau News) त्यामुळे या आंदोलनामागे असणाऱ्या हिंदुस्थानी भाऊचा पोलिसांकडून शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून, विद्यार्थांची डोकी भडकवणाऱ्या हिंदुस्थानी भाऊला अटक होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Will Hindustani Bhau Be Arrested)

हेही वाचा: शिक्षणाशी संबंध नसलेल्या लोकांचा आंदोलनात सहभाग - बच्चू कडू

दहावी आणि बारावीच्या (10th and 12th Board exams) ऑफलाईन परीक्षांना (Offline Exams) विद्यार्थ्यांकडून पुणे, नागपूरसह मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जात आहे. दरम्यान, दहावी बारावी बोर्ड परीक्षा एक महिनाभर आलेली असताना दहावी बारावी बोर्ड परीक्षा नेमकी वेळापत्रकानुसार होणार की लांबणीवर जाणार? याबाबत सध्यातरी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने वेळापत्रकानुसारच होईल असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

पुणे (Pune), नागपूर (Nagpur) आणि अकोल्यासह काही ठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्य सरकारसमोर आव्हान निर्माण होणार असल्याची शक्यता आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी पुणे, नागपुरसह अन्य काही शहरांत गर्दी केली. ऑफलाईन परीक्षा रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. वर्षभर ऑनलाइन शिकवलं, तर मग परीक्षाही ऑनलाईन घ्या. तुम्ही वर्षभर ऑनलाइन शिकवता आणि ऑफलाइन परीक्षा घेता, हे योग्य नाही. त्यामुळे परीक्षा रद्द करा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी रेटून धरली आहे.(Student Protest in Maharashtra)

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. त्यामुळे वर्षभर शाळा या ऑनलाइन होत्या. ऑनलाइन शिक्षण देण्याच्या प्रक्रियेत ग्रामीण आणि मागासभागातील ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेता आलं नाही. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी रेटून धरली. ऑनलाइन शिक्षण दिल्यानंतर ऑफलाईन परीक्षा घेणं योग्य नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका असे सांगत, दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करीत विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला. मात्र वेगवेगळ्या शहरांत विद्यार्थी एकाच वेळी एकत्र कसे आले? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी परीक्षा एक महिना पुढे ढकलण्यात याव्यात अशा प्रकारचा प्रस्ताव शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी समोर ठेवला आहे. त्यामध्ये दहावी बारावी बोर्ड परीक्षा देणारे विद्यार्थी आणि पालकांनीसुद्धा परीक्षा संदर्भात संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Web Title: Ssc Hsc Student Protest Police Planning To Arrest Hindustani Bhaou

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :examProtest
go to top