esakal | SSC Result 2021: कोकण विभाग अव्वल, मुलींचीच बाजी; 90 टक्क्यांच्यावर तब्बल इतके विद्यार्थी
sakal

बोलून बातमी शोधा

SSC Result Maharashtra

SSC Result 2021: कोकण विभाग अव्वल, यंदाही मुलींचीच बाजी

sakal_logo
By
शरयू काकडे, मिनाक्षी गुरव

पुणे : अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे दहावीच्या परिक्षेचा निकाल लावण्यात आला आहे. आज(शुक्रवार) दुपारी एक वाजता ऑनलआईन पध्दतीने निकाल जाहीर होणार आहे. दहावीचा विक्रमी निकाल असून 99.95 टक्के इतका आहे. यंदाही दहावीच्या निकालांमध्ये मुलींनी बाजी मारली असून 99.96 टक्के असून मुलांचा निकाल 99.94 टक्के इतका आहे. पुणे शिक्षण मंडळाची पत्रकार परिषदेत ही माहिती जाहीर केली. दरम्यान, पुर्नमुल्यांकन केलं जाणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

90 च्या वर टक्केवारी असेलेले एकूण 83262 विद्यार्थी आहेत तर, 100 टक्के गुण असणारे विद्यार्थी 957 आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत निकाल वाढलेला आहे. शाळा स्तरावर मूल्यमापन केल्यामुळे ही वाढ दिसून येतेय. ज्यांचं मूल्यमापन केले नाही त्यांचे निकाल राखीव ठेवले जाणार आहेत. एकूण 4922 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवलेत. अधिकतर मुले रिपीटर आहेत. मागच्या दोन तीन वर्षांच्या मार्कलीस्ट उपलब्ध होणं आवश्यक आहे. मात्र, अधिक वर्षांच्या कालावधीचे असतील तर डेटा मागवण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे त्यांचा निकाल नंतर लागेल असेही यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा: कुठे अन् कसा पाहाल दहावीचा निकाल

पुणे विभागाचा निकाल 90.45 टक्के इतका असून कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. नागपूर विभागाचा 99.84 टक्के निकाल तर कोल्हापूर विभागाचा निकाल 99.02 टक्के लागला आहे. दहावीच्या परिक्षेत 27 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे

राज्यातील 22,384 शाळांचा निकाल 100 टक्के निकाल लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 2021 चा निकाल 4.65 टक्क्यांनी अधिक आहे. खासगी शाळेतील विद्यार्थ्यी 28424 एवढे विद्यार्थी उतीर्ण झाले असून 97.45 टक्के निकाल लागला आहे.

loading image