दहावीचा निकाल आज होणार जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

पुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता.8) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. दहावीचा निकाल आणि विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण "www.mahresult.nic.in' या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत, अशी माहिती मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. 

दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील 17 लाख 51 हजार 353 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. जवळपास 21 हजार 986 माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. ही परीक्षा 4,657 केंद्रांवर घेण्यात आली. यात 16 लाख 37 हजार 783 नियमित, 67,563 पुनर्परीक्षार्थी आणि 46,006 इतर विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. 

या संकेतस्थळावर पाहा दहावीचा निकाल : 
- www.mahresult.nic.in 
- www.sscresult.mkcl.org 
- www.maharashtraeducation.com 

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना : 
- ऑनलाइन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी 9 ते 18 जूनपर्यंत, 
तर छायाप्रतीसाठी 9 ते 26 जूनपर्यंत अर्ज करता येईल. 
- उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुढील पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी विभागीय 
मंडळाकडे अर्ज करावा. 
- सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत पुन:श्‍च परीक्षेस प्रविष्ट होण्याची संधी मिळेल.

Web Title: SSC result will be announced today