एसटी कर्मचाऱ्यांचा विष पित आत्महत्येचा प्रयत्न; उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू | Maharashtra Government | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

deepak Khorgade

मोखाडा : एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

sakal_logo
By
भगवान खैरनार

मोखाडा : एसटी कर्मचाऱ्यांनी (St Bus Employee) राज्य सरकारमध्ये (mva government) एसटीच्या विलनीकरणाची मागणी (ST Merge demand) करत राज्यभरात संप पुकारला (strike)आहे. या संपात पालघर (palghar) जिल्ह्यातील जव्हार आगारचे कर्मचारी (Jawhar Depot employee) सहभागी झाले असून संपातील दिपक खोरगडे (३०) या वाहकाने (deepak Khorgade) मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होत नसल्याने शनिवारी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न (suicide attempt) केला. या कर्मचाऱ्यांला तातडीने जव्हार उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल (driver admitted) करण्यात आले.

हेही वाचा: राज्यभरात 3166 एसटी कर्मचारी कामावर दाखल

जव्हार आगारातील एसटी कर्मचारी गेल्या पाच दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी राज्यातील कर्मचाऱ्यांसह संपात उतरले आहेत. या संपात उतरलेल्या वाहक दिपक रमेश खोरगडे (३०) यांनी शनिवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास संपाबाबत सरकार तोडगा काढत नसल्याने आणि कुटुंबाची जबाबदारी कशी पेलायची या चिंतेतून घरी जाऊन विष पीत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर खोरगडे यांना तातडीने जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जव्हार पोलिस आणि आगार व्यवस्थापक हे रुग्णालयात दाखल झाले. घटनेची माहिती घेतली जात असून संबंधिताचा जबाब घेतला जात असल्याची माहिती यावेळी जव्हारचे पोलीस निरिक्षक आप्पासाहेब लेंगरे यांनी दिली.

दरम्यान एस टी चे राज्यशासनात विलीनीकरण होणार नाही, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले, तसेच आहे त्या पगारात सुखी राहा, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितल्याचे बातम्यांध्ये ऐकताच मानसिक स्थिती बिघडल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, असा जबाब पीडित रुग्णाने जव्हार पोलिसांना दिला आहे.

loading image
go to top