राज्यभरात 3166 एसटी कर्मचारी कामावर दाखल | ST Bus Corporation Strike | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus Employee

राज्यभरात 3166 एसटी कर्मचारी कामावर दाखल

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST employee strike) कायम असल्याने महामंडळाच्या महसुलाचे प्रचंड (st bus corporation loss) नुकसान होत आहे. आधीच 12 हजार कोटीचा (twelve thousand crore loss) संचित तोटा झाला असल्याने, पोलीसांच्या बंदोबस्तात एसटीची सेवा (ST bus facility) सुरू केली आहे. कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी (protection responsibility) सुद्धा एसटी प्रशासनाने घेतल्याने शुक्रवारी 36 तर शनिवारी 71 बसेस रस्त्यावर उतरल्या असल्याचे एसटी महामंडळ प्रशासनाने सांगितले आहे.

हेही वाचा: आकांक्षाला भर रस्त्यात संपवण्याचं कारण आलं समोर, मुंबईतील थरारक घटना

राज्यभरात चालक आणि वाहकांची संख्या एकूण 65 हजार 280 आहे. शुक्रवारी त्यापैकी 143 कर्मचारी राज्यभरात कामावर रूजू झाले आहे. यातुलनेत 36758 चालक तर 27023 वाहक असे एकूण 63 हजार 781 एसटी कर्मचारी अद्याप संपात सहभागी आहे. त्यापैकीच आतापर्यंत एकूण 2053 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर उच्च न्यायालय आणि औद्योगीक न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 343 कर्मचाऱ्यांवर अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. सोमवारी या अवमान याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी असून, एसटी कर्मचारी मात्र, एसटीचे विलीनीकरण होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याची ठाम भूमिका घेतली आहे.

प्रवर्ग - एकूण कर्मचारी - हजर कर्मचारी - संपात सहभागी कर्मचारी

प्रशासकीय - 9426 - 2265 - 6849

कार्यशाळा - 17560 - 758 - 15956

चालक - 37225 - 111- 36758

वाहक - 28055 - 32 - 27023

एकूण - 92266 - 3166 - 86586

loading image
go to top