आकांक्षाला भर रस्त्यात संपवण्याचं कारण आलं समोर, मुंबईतील थरारक घटना | Chembur murder | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकांक्षा खरटमोल

आकांक्षाला भर रस्त्यात संपवण्याचं कारण आलं समोर, मुंबईतील थरारक घटना

मुंबईत चेंबूरमध्ये बुधवारी भररस्त्यात तरुणीची चाकूने भोसकून हत्या (Murder) करण्यात आली. आरोपीने तरुणीला रिक्षातून खेचून बाहेर काढलं व चाकूने तिच्यावर प्राणघातक वार केले. पोलिसांनी (Police) आरोपी अक्षय आठवलेला (२४) अटक केली आहे. आकांक्षा सुरेश खरटमोल असं मृत तरुणीचं नाव आहे. या हत्येमागचं कारण आता समोर आलं आहे. मृत तरुणी वाशी नाका (Vashi naka) येथे रहायला होती.

आकांक्षा दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडली आहे, असा संशय अक्षयच्या मनात निर्माण झाला होता. म्हणून तो तिचा पाठलाग करत होता असे पोलिसांनी सांगितले. हत्येसाठी इतकंच कारण नाहीय. आरोपी अक्षय सुद्धा वाशी नाका येथेच रहायला आहे. अक्षय आणि आकांक्षा परस्परांच्या प्रेमात पडले, पळून गेले आणि २०१९ मध्ये वांद्रे कोर्टात लग्न केलं. पण लग्नानंतर सर्व काही सुरळीत नव्हतं. यावर्षीच त्यांचा घटस्फोट झाला होता. पण अक्षय आकांक्षाला विसरला नव्हता. त्याला ती अजूनही आवडत होती. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: कंगना रणौत म्हणाली, मी माझा 'पद्म श्री' पुरस्कार परत करेन पण....

आकांक्षाचा नऊ नोव्हेंबरला बर्थ डे होता. अक्षयला काहीही करुन तिला भेटायचं होतं. त्याने तिला अनेक मेसेजेसही केले होते. पण तिने एकाही मेसेजला प्रतिसाद दिला नाही. बुधवारी सकाळी १० च्या सुमारास आकांक्षा रिक्षातून धारावीच्या दिशेने जात होती. अक्षयने राहुल नगरपर्यंत बाईकने आकांक्षाचा पाठलाग केला. आकांक्षा ऐकत नाहीय, लक्षात आल्यावर त्याने बाईक आडवी आणून रिक्षाचा मार्ग अडवला.

हेही वाचा: आलिया भट म्हणाली,''व्वा! सासुबाई खूप सुंदर''

त्याने आकांक्षाला खेचून बाहेर काढलं व तिच्यावर प्राणघातक वार केले. रस्त्यात रक्ताच्या थारोळ्या कोसळलेल्या आकांक्षाला रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आकांक्षाने तिच्या बर्थ डेच्या दिवशी भेटायला नकार दिला, म्हणून अक्षयला तिचा राग आला होता. आकांक्षा धारावी येथील रुग्णालयात रिसेप्शनिस्टची नोकरी करत होती.

loading image
go to top