परिवहन मंत्री परब यांची एसटी मुख्यालयातील बैठक निष्फळ

परिवहन मंत्र्यांची अजय गुजर यांच्या शिष्टमंडळासोबत झाली बैठक
Anil Parab
Anil Parab sakal media

मुंबई : एसटी महामंडळाचे (ST Bus corporation) मुंबई सेंट्रल (Mumbai central) येथील मुख्यालयात परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab), एसटीचे व्यवस्थापकीय संचालक, वरिष्ठ अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे (ST employee union) पदाधिकाऱ्यांशी बैठक पार पडली दरम्यान कोणताही तोडगा निघू शकला नाही. शिष्टमंडळात सहभागी वकील गुणरत्न सदावर्ते (Adv Gunratan sadavarte) यांनी विलीनीकरणाच्या मागणी (merge demand) लावून धरत राज्य सरकारने (mva government) महाधिवक्त्यांशी चर्चा करण्याची मागणी केली.

Anil Parab
मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या १९५ नव्या रुग्णांची भर; एकाचा मृत्यू

अनिल परब यांनी न्यायालयाने गठीत केलेल्या समितीच्या आदेशानंतर अहवाल येईपर्यंत कोणताही निर्णय घेता येणार नसल्याचे स्पष्ट करत एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करत आहे. मात्र, संपाच्या नावावर राजकारण सुरू आहे. राजकारण्यांनी राजकीय पोळी भाजावी मात्र, ती जळणार नाही याची काळजी घ्यावी अशी टीका ही यावेळी अनिल परब यांनी संपकर्त्यांचे नेतूत्व करणाऱ्या भाजपा नेत्यांवर केली आहे. आंदोलन, संप हा कामगारांचा अधिकार आहे.मात्र, कोणी भडकावून संपकर्त्य चुकीची कृती करत असेल तर कामगारांचेच वाईट होईल. तर उद्या कारवाई झाल्यास कोणी वाचवायला येणार नसल्याचीही टीका परब यांनी केली.

मुंबईच्या प्रवेशद्वारावर पोलिसांचा पहारा

आझाद मैदानात रोटेशन पद्धतीने सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात कर्मचारी घटत असल्याने शुक्रवारी सदाभाऊ खोत यांनी आणखी कर्मचार्यांनी विलीनीकरणाच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. दरम्यान राज्यभरात ठिकठिकाणी रेल्वे स्थानकांवर एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. शिवाय मुंबईच्या पाच ही प्रवेशद्वारावर आज सकाळपासूनच पोलिसांचा कडक बंदोबस्त बघायला मिळाला, जिथे संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडवण्यात आले.

संप चिघळण्याची शक्यता

नेहमीपेक्षा शनिवारी एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढली असून, मिळेल त्या गाडीने कर्मचारी मुंबईच्या आझाद मैदानात पोहचले आहे. शनिवारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्यावर जाऊन मृतक एसटी कर्मचाऱ्यांच्या पत्नीच्या हस्ते परब यांना आहेर देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच सावध भूमिका घेत प्रयत्न हाणून पाडला मात्र, गेल्या 27 ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या संपातील कर्मचारी अद्याप विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम असल्याने संप चिघण्याची शक्यता दिसून येत आहे.

Anil Parab
अँटिलिया स्फोटक प्रकरण : आरोपी नरेश गोरला याला सशर्त जामीन मंजूर

एकूण 618 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता

रोजंदारी गटातील एसटी कर्मचाऱ्यांना यापूर्वी सेवा समाप्तीची नोटिस बजावण्यात आली होती. 24 तासात कामावर हजर न झाल्यास सेवा समाप्त करण्याचा इशारा महामंडळाने दिला होता. दरम्यान गेल्या दोन दिवसात एकूण 618 रोजंदारी एसटी कर्मचाऱ्यांना कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन व नियमाप्रमाणे एक महिन्याचे वेतनाचा धनादेश देवुन त्यांच्या सेवा कायमस्वरुपी समाप्त करण्यात आले आहे.तर शनिवारी सुद्धा निलंबनाची कारवाई करून आता निलंबनाची आकडेवारी 2937 वर पोहचली आहे.

250 पैकी एकही आगार सुरू करण्यास प्रशासन असमर्थ

परिवहन मंत्री अनिल परब वेळोवेळी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन करत असताना अद्याप कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती,निलंबनाची कारवाई सुरू केल्याने शनिवार पर्यंत 7315 कर्मचारी कामावर रुजू झाल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे.मात्र, प्रत्यक्षात एसटीच्या 250 आगारांपैकी एकही आगार सुरू करण्यास एसटी महामंडळ प्रशासन आणि राज्य सरकार असमर्थ ठरलं असल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com