एसटीच्या खाजगीकरणाचा पर्याय खुला; पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीपवर अभ्यास | ST bus corporation update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST bus

एसटीच्या खाजगीकरणाचा पर्याय खुला; पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीपवर अभ्यास

मुंबई : एसटी महामंडळाचे (ST bus corporation) खाजगीकरण (privatization) करण्याचा सध्या कुठलाही विचार नाही. मात्र आम्ही त्याकडे एक पर्याय म्हणून बघतो असं विधान परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी शुक्रवारी केले. त्यामूळे गुरुवारपासून एसटीच्या खासगीकरणाची जोरदार झालेल्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. मात्र, केपीएमजीला प्रमुख सहा विषयांवर दिलेल्या अभ्यासामध्ये पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीपवर (public-private partnership study) अभ्यास करण्याच्याही सुचना असल्याने, खासगीकरणाच्या शक्यतेवर विचार सुरु आहे.

हेही वाचा: मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 2274 दिवसांवर

दूसरीकडे एसटीमध्ये सुधारणा आणण्यासाठी राज्य सरकार वेगाने पाऊल उचलत असल्याचे स्पष्ट झाले आहे.एसटीमध्ये महामंडळाने केपीएमजी या खाजगी कंपनीची मदत घेतली आहे. एसटी महामंडळाची व्यावसायिक आणि संस्थात्मक पुर्नरचना करण्यासाठी केपीएमजीला प्रोजेक्ट सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे, या कामासाठी 18 लाख रुपये या कंपनीला दिले जाणार आहे. इतर राज्यातील एसटीच्या कार्यप्रमाणीचा अभ्यास करुन चार आठवड्याच्या आत कंपनीला हा अहवाल सादर करायचा आहे. पाच मुद्यावर या कंपनीला आपला अहवाल सादर करायचा आहे.

कंपनीला 6 प्रमुख मुद्यावर अभ्यास करुन अहवाल सादर करण्यास सांगीतले आहे. त्यातील शेवटच्या विषयावर गुरुवारी वाद निर्माण झाला,एसटी खाजगीकरणाच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल असल्याची टिका अनेकांनी केली होती. यामध्ये सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीतून एक नव मॉडेल शोधून काढण्याच्या शक्यतेवर अभ्यास करण्याच्या सुचना कंपनीला देण्यात आल्यात.

कंपनी या विषयावर अभ्यास करणार

1.एसटीचा ऑपरेशनल खर्च कमी करणे,त्याची कार्यपध्दती

2.आवश्यकता नसलेल्या बाबीवर खर्च कमी करणे

3.एसटीसाठी नवीन आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत शोधणे

4.एसटीची व्यावसायिक आणि संस्थात्मक पुनर्रचना

5. काम सुधारण्यासाठी उपाययोजना

6. सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या शक्यतेचा विचार

loading image
go to top