#MarathaKrantiMorcha मराठा आंदोलनामुळे एसटीला 15 कोटींचा फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनामुळे एसटी महामंडळाचा 15 कोटींचा महसूल बुडाला आहे. आंदोलकांनी एसटी गाड्यांना लक्ष्य केल्याने एसटीचे आत्तापर्यंत गेल्या पाच दिवसांत सुमारे 50 लाखांचे नुकसान झाले आहे. त्यातच आता दिवसेंदिवस आंदोलनाची धग वाढत असल्याने एसटीच्या चिंतेत भर पडली आहे. 

आज राज्यभरात एसटीच्या एकूण 250 आगारांपैकी 194 आगार अंशात सुरू तर 56 आगार पूर्ण बंद आहेत. एसटी बसच्या एकूण 14 हजार 550 फेऱ्यांपैकी तब्बल 8 हजार 969 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. यामुळे एसटी महामंडळाला आपल्या 15 कोटींच्या महसूलावर पाणी सोडावे लागले आहे. तर गेल्या चार दिवसात संतप्त आंदोलकांनी विविध ठिकाणी एसटी गाड्यांना लक्ष्य केल्याने 183 बसचे नुकसान झाले आहे. त्यामुळे एसटीला 50 लाखांचा भुरदंड सहन करावा लागणार आहे. यामुळे सध्या वार्षिक 544 कोटी रुपये तोट्यात असलेल्या महामंडळच्या तोट्यात अशा नुकसानीमुळे भरच पडणार आहे. 

विभागवार आकडेवारी

विभागाचे नाव - एकूण आगार - नियोजित फेऱ्या - रद्द फेऱ्या - अंशत: सुरू आगार - बंद आगार 

औरंगाबाद - 47 - 2687 -   663 - 26 - 21
मुंबई.        - 45 - 2912 - 2330 - 40 - 05
नागपूर      - 26 - 1603 - 1518 - 26 - 00
पुणे.         - 55 - 2155 - 1543 - 46 - 09
नागपूर.     - 44 - 3367 - 1018 - 23 - 21 
अमरावती. - 33 - 1526 - 1085 - 33 - 00

Web Title: ST Bus Losses of 15 Crore in Maratha Kranti Morcha