ST Bus Roof Sheet Blown Off
esakal
राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांच्या दयनीय अवस्थेचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धावत असलेल्या एसटी बसचे छत अचानक उखडल्याचा आणि चालकाने स्वतः हाताने ओढून ते पुन्हा जागेवर बसवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.