Dasara Melava : शिंदे गटाच्या शक्तिप्रदर्शनासाठी एसटी महामंडळ धारेवर? ग्रामीण भागाचे हाल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde
Dasara Melava : शिंदे गटाच्या शक्तिप्रदर्शनासाठी एसटी महामंडळ धारेवर? प्रवासी सेवा ठप्प होण्याची भीती

Dasara Melava : शिंदे गटाच्या शक्तिप्रदर्शनासाठी एसटी महामंडळ धारेवर? ग्रामीण भागाचे हाल?

दसरा मेळाव्याच्या वादात हायकोर्टाने शिवाजी पार्क ठाकरेंच्या शिवसेनेच्या पारड्यात टाकलं आहे. दरम्यान शिंदे गटाकडेही आता बीकेसीतल्या मैदानाचा पर्याय आहे. त्यामुळे आता इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहेत. यासाठी आता शिंदे गट जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. यासाठी शिंदे गट एसटी महामंडळाला धारेवर धरणार असल्याची चिन्हं आहेत.

हेही वाचा: Dasara Melava : न्यायालयाच्या निकालावर CM शिंदेंनी इशाऱ्यानेच दिली प्रतिक्रिया; बोलणं टाळलं!

शिंदे गटाने दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्यासाठी कंबर कसली आहे. राज्याच्या विविध भागांमधून कार्यकर्ते आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गाड्यांचं बुकिंग केलं आहे. एसटी बसेसचंही समूह आरक्षण करण्यासाठी आता आमदार, पदाधिकारी सज्ज झाले आहे. यासाठी चार हजारांहून अधिक एसटी गाड्यांचं बुकिंग करण्याचं नियोजन असल्याची माहिती हाती येत आहे.

हेही वाचा: Uddhav Thackeray : दसरा मेळाव्यात ठाकरे परिवार हुकुमाचा एक्का बाहेर काढणार? नव्या पोस्टरची चर्चा

शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी एसटी महामंडळाकडे ४,१०० गाड्यांसाठी विचारणा करण्यात आली आहे. मात्र यामुळे नियमित वाहतुकीवर परिणाम होण्याची चिंता एसटी महामंडळाला सतावत आहे. ऐन गर्दीच्या हंगामात एवढ्या मोठ्या संख्येने गाड्या आरक्षित केल्याने नियमित वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच सध्या महामंडळाकडे पुरेशा गाड्याही उपलब्ध नाही. सध्या एसटी महामंडळाकडे १५,५०० गाड्या उपलब्ध आहेत. त्यातल्या ४ हजार गाड्या शिंदे गटाला दिल्यास ग्रामीण भागातल्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.